पुणे सीमा शुल्क विभागाकडून वाघांची कातडी विकणार्‍या टोळीला अटक !

  • ५ कोटी रुपयांची कातडी हस्तगत ! 

  • टोळीप्रमुख रहिम रफीक !

पुणे – वाघाची शिकार करून कातडी विकणार्‍या टोळीला सीमा शुल्क विभागाने कारवाई करत अटक केली आहे. या टोळीतील ६ जणांना कह्यात घेतले आहे. त्यात २ महिलांचाही समावेश आहे. या टोळीचा प्रमुख सूत्रधार रहिम रफिक असल्याची माहिती मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या कातडीची किंमत ५ कोटी रुपये असल्याचे उघडकीस येत आहे. या टोळीने एका वनगायीला विष देऊन ठार मारले आणि ती गाय वाघाच्या तोंडी दिली. ती गाय खाल्ल्याने वाघाचा मृत्यू झाल्याचे अन्वेषणातून उघड झाले आहे.

अजवर भोसले, नदीम शेख, महंमद खान, रहीम रफिक, तेवाबाई पवार, कंगनाबाई भोसले अशी कह्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. कह्यात घेतलेल्या रहीम रफिकची चौकशी केली असता त्याला यापूर्वी वन विभागाने अटक केली होती, अशी माहिती समोर आली. (पहिल्याच गुन्ह्याच्या वेळी कठोर शिक्षा न केल्याने आरोपीने पुन्हा दुसरा गुन्हा केला आहे. शिक्षेचे भय गुन्हेगारांमध्ये केव्हा निर्माण करणार ? – संपादक) टोळीतील महंमद खान हा भोपाळचा रहिवासी आहे.