‘लव्ह जिहाद’चे भीषण वास्तव दर्शवणारी अन् प्रत्येक हिंदूने वाचावी अशी ‘लव्ह जिहाद’ कादंबरी !

‘लव्ह जिहाद’ कादंबरीचे मुखपृष्ठ

१. ‘लव्ह जिहाद’चे भीषण संकट रोखण्यासाठी कादंबरीच्या माध्यमातून जनजागृती करणे

श्री. दिलीप देशपांडे

गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातून मुलींचे गायब होण्याचे प्रमाण पुष्कळ वाढले आहे. आतापर्यंत जवळपास १२ ते १३ सहस्र मुली बेपत्ता झाल्या आहेत. (वर्ष २०१९ ते २०२१ या ३ वर्षांच्या कालावधीत १ लाख युवती महाराष्ट्रातून गायब असल्याची माहिती देणारी जनहित याचिका सांगली येथील शहाजी जगताप यांनी मुंबई उच्च न्यायालयात नुकतीच प्रविष्ट (दाखल) केली आहे. – संपादक) काही वेळा या मुली अन्य धर्मीय, म्हणजे ख्रिस्ती किंवा मुसलमान यांच्या आमिषांना भुलून किंवा त्यांच्या बळजोरीला नाईलाजास्तव स्वीकारून संबंधितांशी विवाह करतात. त्यांच्या आयुष्याची वाताहात होते. गेल्या काही वर्षांत अनेक मुली लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकल्या आहेत. त्यांनी मुसलमान धर्मही स्वीकारला आहे. प्रतिदिन ६० ते ७० तरुणी गायब होतात. मुसलमानांच्या कह्यात गेल्यावर या मुलींचे काय होते, याविषयीच्या घटना ऐकून अंगावर काटा येतो. मुलींनी अशा प्रकरणांच्या आहारी जाऊ नये, तसेच सतर्कता बाळगावी, यासाठी विजय शेंडगे यांनी ‘लव्ह जिहाद’ कादंबरी लिहिली आहे. ‘लव्ह जिहाद’च्या दुःस्थितीकडे पोलीस आणि राजकारणी यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे ‘आता हिंदु तरुण-तरुणींनी बोध घ्यावा’, अशी शेंडगे यांची तळमळ आहे.

२. वैचारिक परिवर्तनाच्या चुकीच्या संकल्पना !

मुसलमान मुली सहसा हिंदूंच्या प्रेमात पडत नाहीत; परंतु हिंदु मुली मुसलमानांच्या प्रेमात पडल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यांच्या मुली हिजाब घालतात; पण हिंदूंच्या मुली ओढणीही नाकारतात. त्यांच्या स्त्रिया बुरख्यात असतात. त्यांच्या मते हिंदूंच्या बायका मूर्ख असतात. जातीबाह्य, धर्मबाह्य विवाह करणे, देवाचे अस्तित्व नाकारणे, संस्कार नाकारणे, चालीरिती न मानणे हेच सध्याच्या काळात प्रत्येकाला वैचारिक परिवर्तन वाटते. ‘समानता म्हणजे काय ?’ स्त्री-पुरुष समानता म्हणता म्हणता आता मुलीही सिगारेट आणि अमली पदार्थ घेत आहेत. मद्यपान करत आहेत. पबमध्ये जात आहेत. मुलामुलींना आई-वडिलांच्या विरोधात जाऊन मनमानी करण्यात मोठेपणा वाटतो.

३. प्रेम हे फसवण्याचे हत्यार समजणारे मुसलमान !

स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार असा झाला आहे. मुसलमानांच्या मते, आपल्या हिंदु मुली मूर्ख असतात, त्यांना कोणतेही आमीष दाखवले की, त्या मागे फिरतात. ‘आमच्यासाठी तर प्रेम हे हत्यार आहे त्यांना फसवण्याचे !’, अशी त्यांची भूमिका असते.

४. कुणाच्या प्रेमात पडायचे, याचा विचार करा !

प्रेमात पडू नये, असे नाही; परंतु आपण कुणाच्या प्रेमात पडत आहोत ? याचा विचार करायला हवा; कारण तुकडे मुलीचे होतात, जीव तिचा जातो आणि दुःख अंतःकरणात घेऊन डोळे मिटण्याची वेळ आई-वडिलांवर येते.

५. ‘लव्ह जिहाद’मधील धोक्यांची जाणीव करून देण्याचे कादंबरीमागील प्रयोजन

सत्य नाकारता येत नाही, हीच या कादंबरीमागील भूमिका आहे. ही कादंबरी प्रत्येक मुलीच्या हाती पडायला हवी. तसे झाल्यास हिंदु तरुणी लव्ह जिहादच्या विळख्यात अडकणार नाहीत. ‘अनेक जणींच्या आयुष्याची वाताहात झाली. अनेकांच्या देहाचे तुकडे झाले. आरोपींना फाशी झाली, तरी गेलेला जीव परत येत नाही. त्यामुळेच हिंदु तरुणींना जागे करावे, त्यांना ‘लव्ह जिहाद’मधील धोक्यांची जाणीव करून द्यावी. आई-वडिलांच्या, नात्या-गोत्यातील आप्तांच्या प्रेमाची महती पटवून द्यावी’, या हेतूने ही कादंबरी लिहिल्याचे शेंडगे सांगतात.

६. कादंबरीविषयी वाचकांच्या प्रतिक्रिया 

अ. ‘लव्ह जिहाद’ ही कादंबरी म्हणजे दुराचार्‍यांविषयीच्या क्रोधाचा कडेलोट करणारी कादंबरी आहे.

आ. जन्मदात्या आई-वडिलांना कस्पटासमान बाजूला सारून ४ दिवसांपासून आयुष्यात आलेल्या आगंतुकास कवटाळणार्‍या मुलींच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारी कादंबरी आहे.

इ. ‘लव्ह जिहाद’च्या विरोधातील निर्भीड पत्रकारिता कशी असावी, याचा वस्तूपाठ देणारी उत्कृष्ट कादंबरी आहे.

७. मान्यवरांच्या प्रतिक्रिया

अ. पोलीस खात्यात साहाय्यक पोलीस आयुक्त या पदावरून निवृत्त झालेले राज्य गुन्हे शाखेचे सुरेश पवार म्हणतात, ‘‘प्रत्येक तरुण मुलामुलींनी ही कादंबरी वाचायला हवी. लव्ह जिहादच्या विरोधात काम करणारी संस्था निर्माण झाल्यास त्यात मलाही काम करायला आवडेल.’’

आ. ‘प्रत्येक टप्प्यावर हिंदूंची मानसिकता शेंडगेंनी योग्य पद्धतीने दाखवली आहे’, असे सनातन धर्माचे अभ्यासक सुजित भोगले म्हणतात.

८. शाळा-महाविद्यालये, तसेच वाचनालये येथे ही कादंबरी उपलब्ध व्हावी !

ही कादंबरी मनोरंजनात्मक नाही. एरव्ही कादंबरी एका बैठकीत वाचून होते; परंतु ही कादंबरी विचार करायला लावणारी आहे. शाळा-महाविद्यालये, तसेच वाचनालये येथे ही कादंबरी असायला हवी. तसे झाल्यास मुले-मुली ती वाचून सावध होतील !

९. फसव्या प्रेमातील धोक्यांची जाणीव करून देणारी कादंबरी अवश्य वाचा !

‘शांती पब्लिकेशन’, पुणे यांनी ही कादंबरी प्रकाशित केली आहे. आता ती ‘बुकगंगा’ या ऑनलाईन संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. हिंदु-मुसलमान द्वेष हा या कादंबरीचा हेतू नाही, तर अपप्रवृत्तींविरुद्धचा लढा हा कादंबरीमागील उद्देश आहे. हिंदु मुलींना ‘लव्ह जिहाद’मधील फसव्या प्रेमातील धोक्यांची जाणीव करून देणे हा या कादंबरीचा विषय आहे. आपली मुले ती कादंबरी वाचतील, यासाठी पालकांनीच प्रयत्न करायला हवेत. २७२ पानांची ५०० रुपये मूल्य असलेली कादंबरी ३५० रुपयांत घरपोच देण्यात येणार आहे.

– श्री. दिलीप देशपांडे, जामनेर, जळगाव.