उरणमधील यशश्री शिंदेची निर्घृण हत्या करणार्या ‘लव्ह जिहाद्या’ला भरचौकात फाशी द्या !
कोल्हापूर येथील हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात मागणी
कोल्हापूर – उरण-पनवेल येथील यशश्री शिंदे हिची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकारामुळे केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभर संताप व्यक्त होत आहे. ‘लव्ह जिहाद’च्या धोक्यामुळे हिंदु युवती आणि महिला अजूनही असुरक्षित आहेत, तसेच त्यांच्या निर्घृण हत्या चालूच आहेत. त्यामुळे अशा जिहाद्यांवर जरब बसण्यासाठी उरणमधील यशश्री शिंदेची निर्घृण हत्या करणार्या ‘लव्ह जिहाद्या’ला भरचौकात फाशी द्या, अशी एकमुखी मागणी कोल्हापूर येथील ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या वतीने घेण्यात आलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात करण्यात आली. ३१ जुलैला छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हे आंदोलन घेण्यात आले.
या प्रसंगी मनोगत व्यक्त करतांना ‘भारतीय मजदूर संघा’च्या अधिवक्त्या अनुजा धरणगावकर म्हणाल्या, ‘‘उरण येथे झालेली ही पहिली घटना नसून हिंदु युवतींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्या फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. तरी शासनाने लाडकी बहीण योजनेसमवेत सुरक्षित बहीण, सुरक्षित माता योजनाही राबवली पाहिजे.’’ शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे म्हणाले, ‘‘नुकतीच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली. याचा मी निषेध करतो. या देशात हिंदूंना ‘टार्गेट’ करून त्यांची हत्या केली जात आहे. हिंदु महिला-युवती यांच्यावरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांसाठी उत्तर प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात कठोर कायद्यांची आवश्यकता आहे. त्यासाठी येणार्या काळात हिंदूंची मतपेढी निर्माण झाली पाहिजे.’’
या प्रसंगी हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे समन्वयक श्री. आनंदराव पवळ यांनी ‘महिलांनी वाढत्या अत्याचारांच्या विरोधात जशास तसे उत्तर देण्यास शिकले पाहिजे’, असे आवाहन केले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी धारावी (मुंबई) येथे हिंदु तरुणाची हत्या करणार्या धर्मांधांना तात्काळ अटक करा, अशी मागणी केली.
या आंदोलनात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, ‘शिवशाही फाऊंडेशन’चे संस्थापक श्री. सुनील सामंत, हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रतिभा तावरे, हिंदू एकता आंदोलनाचे शहरप्रमुख श्री. गजानन तोडकर, ‘मातृशक्ती संघटने’च्या सौ. अश्विनी ढेरे, ‘राष्ट्रहित प्रतिष्ठान’चे श्री. शरद माळी यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले.
उपस्थित मान्यवर
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले, श्री. अर्जुन आंबी, अखिल भारत हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. संदीप सासणे, श्री. विकास जाधव, बजरंग दलाचे श्री. अक्षय ओतारी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. राजेंद्र बुरुड, हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, ‘महाराजा प्रतिष्ठान’चे संस्थापक अध्यक्ष श्री. निरंजन शिंदे, ‘मराठा तितुका मेळवावा’चे श्री. योगेश केरकर, विश्व हिंदु परिषदेचे श्री. अनिल दिंडे, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप, महिला आघाडीच्या रेखा दुधाणे, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री अभिजित पाटील, रामभाऊ मेथे, आदित्य कराडे यांसह अन्य उपस्थित होते.