Cars For Maharashtra Police : ५६६ कोटी रुपये व्यय करून महाराष्ट्र पोलिसांसाठी २ सहस्र २९८ अत्याधुनिक गाड्यांची होणार खरेदी !
पोलीस महानिरीक्षकांना मिळणार १२ लाख रुपयांची गाडी !
मुंबई, ३१ जुलै (वार्ता.) – वर्ष २०२४ ते २०२८ या कालावधीत महाराष्ट्राच्या पोलीस दलासाठी तब्बल २ सहस्र २९८ अत्याधुनिक वाहने खरेदी केली जाणार आहेत. ही वाहने किती प्रमाणात, कधी आणि कोणत्या किमतीत खरेदी करावयाची, याविषयी पोलीस महासंचालक कार्यालयाकडून सादर केलेला कृती आराखडा गृहविभागाने संमत केला आहे. यासाठी शासनाने ५६६ कोटी १९ लाख १५ सहस्र रुपये इतका निधी संमत केला आहे.
यामध्ये पोलीस महानिरीक्षकांच्या दर्जाच्या अधिकार्यांना १२ लाख रुपये किमतीचे वाहन खरेदी करता येणार आहे. पोलीस अधीक्षक आणि त्यावरील दर्जाच्या अधिकार्यांसाठी ९ लाख रुपयांपर्यंत वाहन खरेदी करता येणार आहे. वर्ष २०२४-२५, २०२५-२६, २०२६-२७ आणि २०२७-२८ या ४ वर्षांत टप्प्याटप्प्याने ही वाहने खरेदी केली जाणार आहेत.
संपादकीय भूमिका
|