Sangamner Love Jihad : संगमनेरमध्ये लव्ह जिहाद : शादाबकडून हिंदु मुलीचे बळजोरीने धर्मांतर आणि लग्न !

  • पीडिता अल्पवयीन असल्यापासून तिला ‘लक्ष्य’ केले !

  • मुख्य सूत्रधारांसह ४ जणांना अटक

संगमनेर (अहिल्यानगर) – एका हिंदु अल्पवयीन मुलीला इयत्ता ९वीत शिकत असतांना ‘लक्ष्य’ करून तिला शादाब तांबोळी याने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. ती सज्ञान झाल्यानंतर मित्रांच्या साहाय्याने तिचे अपहरण केले. बळजोरीने लग्नाच्या आणि धर्मांतराच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी घेतली. तिच्यावर अत्याचार केले. या प्रकरणी शादाब तांबोळी याच्यासह युसूफ चौगुले, कुणाल शिरोळे आणि आयाज पठाण यांच्यावर घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडितेने तक्रार प्रविष्ट करून जे काही घडले, ते पोलिसांसमोर कथन केले.

१. संगमनेर तालुक्याच्या पठार भागात पीडितेचे घर आहे. पीडिता इयत्ता ९वी मध्ये असतांना युसूफ चौगुले या धर्मांधाने तिला लक्ष्य केले. जानेवारी २०२० मध्ये युसूफ याने शादाब याला पुढे करून ‘शादाब पुष्कळ चांगला मुलगा आहे. तुझ्यावर मनापासून प्रेम करतो. तूसुद्धा त्याच्यावर प्रेम केले पाहिजे’, असे सांगत पीडितेला शादाबसमवेत प्रेमसंबंध निर्माण करण्यास भाग पाडले.

२. वर्ष २०२१ मध्ये पीडिता शिक्षणासाठी संगमनेरमध्ये एका वसतीगृहात राहू लागली. तेव्हा शादाब आणि कुणाल यांनी तिला दूरभाष करून गोड बोलून बाहेर बोलावले. तिला एका ‘कॅफे हाऊस’मध्ये घेऊन गेले. त्या ठिकाणी शादाबने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. तिची छायाचित्रे काढली. पुढे पीडितेने त्याच्याशी संपर्क ठेवण्यास नकार दिला, तेव्हा ती छायाचित्रे सामाजिक माध्यमांवर प्रसिद्ध करण्याची आणि कुटुंबियांना पाठवण्याची धमकी देत प्रेमसंबंध ठेवण्यास बाध्य केले.

३. ७ जुलै २०२४ या दिवशी शादाबने पीडितेशी गोड बोलून तिला मंचर येथे बोलावून घेतले. तिथे तिचे अपहरण केले. मुंबई येथे नेऊन तिच्यावर अत्याचार केले. धमकी देऊन लग्न आणि धर्मांतर संबंधी कागदपत्रांवर स्वाक्षरी घेतली.

४. १० जुलै या दिवशी ते दोघे घारगाव पोलिसांसमोर उपस्थित झाले. त्या वेळी शादाबने पीडितेला धमकी दिली, ‘काहीही झाले, तरी पोलीस आणि तुझ्या कुटुंबियांसमोर माझ्या विरोधात काहीही बोलायचे नाही. तसे केले, तर ‘तुझ्या कुटुंबाला संपवून टाकीन’, तसेच ‘पोलिसांसमोर आणि नातेवाइकांसमोर ‘मला शादाबसोबतच रहायचे आहे !’, इतकेच बोलायचे’, अशी धमकीही दिली; परंतु पीडितेने धाडसाने पोलिसांसमोर खरी परिस्थिती सांगितली. तेव्हा त्याच्या विरोधात तक्रार प्रविष्ट (दाखल) करण्यात आली.

५. तिच्यावर केलेली बळजोरी, गुंगीच्या औषधांचा वापर, केलेला शारीरिक अत्याचार आणि मानसिक छळ या कारणांनी पीडितेची शारीरिक प्रकृती बिघडली होती. त्यामुळे तिला वैद्यकीय उपचारासाठी तिच्या कुटुंबाच्या कह्यात देण्यात आले होते. त्यातून बरी झाल्यानंतर २६ जुलै या दिवशी रितसर तक्रार प्रविष्ट करण्यात आली.

मुख्य सूत्रधार युसूफ चौगुले हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता !

मुख्य सूत्रधार युसूफ चौगुले हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता असून पक्षाचा उत्तर महाराष्ट्र ग्रंथालय प्रमुख आहे. तो गुटखा, गांजा यांसह अमली पदार्थांची विक्री करणारा सराईत गुन्हेगार आहे. (गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांचा भरणा असलेलाच हा पक्ष आहे, हे जगजाहीर आहे ! – संपादक)

खासदार नीलेश लंके यांचे उपोषणही संशयाच्या भोवर्‍यात !

खासदार नीलेश लंके

शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी अहिल्यानगर येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण केले. जिल्ह्यामध्ये वाढती गुन्हेगारी, अवैध वाळूउपसा, गुटखा, मद्यविक्री, चंदन चोरी यांसारखे व्यवसाय चालू आहेत. पोलीस त्यांच्याकडून हप्ते गोळा करतात, या विरोधात त्यांनी उपोषण केले होते; परंतु ‘हे त्यांनी केलेले उपोषण नसून लव्ह जिहादच्या प्रकरणातून पोलिसांनी लक्ष काढावे किंबहुना पोलिसांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे’, असा सूर नागरिकांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे खासदार लंके यांनी केलेले उपोषणही संशयाच्या भोवर्‍यात सापडले आहे.

हिंदु समाजाकडून ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’ !

पीडितेचे अपहरण धर्मांध मुसलमानांनी केले असून हे प्रकरण ‘लव्ह जिहाद’चे आहे. यावर पोलिसांनी त्वरित कारवाई करून संबंधितांवर कारवाई करावी. ‘हिंदु मुलीची सुटका व्हावी’, या मागणीसाठी नुकताच ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’चे आयोजन करण्यात आले होते.

संपादकीय भूमिका

यशश्री शिंदे प्रकरण ताजे असतांनाच आता हे प्रकरण समोर आले आहे. भाजपशासित काही राज्यांमध्ये लव्ह जिहादविरोधी कायदा असतांना महाराष्ट्रातील युती सरकारने विधानसभा निवडणुकांच्या आधीच असा कायदा केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !