Islamic preacher Anjem Choudary : ब्रिटनमध्ये कट्टर इस्लामी प्रचारक अंजेम चौधरी याला जन्मठेप

‘अल्-मुहाजिरून’ आतंकवादी संघटना चालवल्याविषयी दोषी !

इस्लामी कट्टरतावादी नेता अंजेम चौधरी

लंडन (ब्रिटन) – पाकिस्तानी वंशाच्या इस्लामी कट्टरतावादी नेता अंजेम चौधरी याला ब्रिटनमध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. वूलविच क्राऊन न्यायालयाने  अंजेम चौधरी याला द्वेषपूर्ण भाषणाद्वारे लोकांना भडकावल्याविषयी आणि ‘अल्-मुहाजिरून’ ही आतंकवादी संघटना चालवल्याविषयी दोषी ठरवले. अंजेम चौधरी याला वर्ष २०१६ मध्ये ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.

१. ‘अंजेम चौधरी याच्या ‘अल्-मुहाजिरून’चा उद्देश शरीयत कायदा हिंसक मार्गाने जगभर पसरवणे आहे’, असे ब्रिटिश न्यायालयाने म्हटले आहे.

२. १० वर्षांपूर्वी ब्रिटनमध्ये ‘अल्-मुहाजिरून’वर बंदी घालण्यात आली होती. असे असतांनाही चौधरी वेगवेगळ्या नावाने ही संस्था चालवत होता. या आतंकवादी संघटनेवर १२ हून अधिक आतंकवादी संघटना घडवल्याचा आरोप आहे.

संपादकीय भूमिका 

  • ‘जिहादी आतंकवाद्यांना धर्म असतो’ , हे आता ब्रिटिशांनाही कळले असेल !
  • जिहाद आतंकवाद्यांना जगाच्या पाठीवर केवळ फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सर्व देशांनी कायदा केला पाहिजे !