भोपाळमध्ये ४ ऑगस्टला ‘हिंदु राष्ट्र विचार मंथन’ कार्यक्रमाचे आयोजन !
भोपाळ (मध्यप्रदेश) – येथील ‘धर्मरक्षक’ या सुप्रसिद्ध हिंदु संघटनेने ४ ऑगस्ट या दिवशी बैरागड, भोपाळ येथे ७ व्या ‘हिंदु राष्ट्र विचार मंथन’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. संघटनेचे प्रदेश राज्य समन्वयक कृष्णा सोलंकी यांनी सांगितले की, या कार्यक्रमात मध्यप्रदेशातील बहुतांश जिल्ह्यांतील अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.