भाग्यनगर येथून येऊन विशाळगडावर मुसलमानांना पैसे वाटणार्यांची सखोल चौकशी करा !- शाहूवाडी येथे निवेदन
शाहूवाडी-मलकापूर(कोल्हापूर)- विशाळगडावर ‘हैदराबाद युथ करेज’ नावाच्या गटाने नोटांची बंडले वाटल्याचा ‘व्हिडिओ’ प्रसारित झाला आहे. हा पैसा या गटाला कुठून उपलब्ध झाला आणि हे पैसे वाटून त्यांना काय साध्य करायचे आहे ? हे समोर आणण्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, या मागणीचे मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शाहूवाडीचे तहसीलदार रामलिंग चव्हाण यांना देण्यात आले. विशाळगडावर १४ जुलैला जो उद्रेक झाला, त्याला पूर्णतः प्रशासन उत्तरदायी असल्याने या प्रकरणी कारवाई केलेल्या सर्व हिंदूंवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, अशी मागणीही या प्रसंगी करण्यात आली.
याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माणसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री.युवराज काटकर, माजीनगराध्यक्ष श्री.उदयसिंह कोकरे-देसाई, राष्ट्रीयस्वयंसेवक संघाचे श्री.अनिल कुलकर्णी, शिवसेना उपतालुकाप्रमुख श्री.विजय लाटकर, मोटारमालकसंघटनेचे श्री.कृष्णात दिंडे, माजीनगराध्यक्ष श्री.राजूभोपळे, हिंदु जनजागृती समितीचे श्री.प्रसाद कुलकर्णी, सर्वश्री रमेश पडवळ, चारुदत्त पोतदार, जितेंद्र पंडित, संदीप धनलोभे यांसह २५ हून अधिक जण उपस्थित होते.-