नवाब मलिक यांना सर्वाेच्च न्यायालयाकडून वैद्यकीय जामीन संमत !
मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांच्या जामिनावर सुनावणी होईपर्यंत सर्वाेच्च न्यायालयाने त्यांचा वैद्यकीय जामीन संमत केला आहे. यापूर्वी न्यायालयाने नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणांसाठी तात्पुरता जामीन दिला होता.
सर्वाेच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांच्यापुढे ही सुनावणी पार पडली. वर्ष २०२२ मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने गोवावाला कंपाऊंड भूमीच्या व्यवहारात आर्थिक अपहारप्रकरणी नवाब मलिक यांना अटक करण्यात आली होती. ऑगस्ट २०२३ मध्ये प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना जामीन मिळाला होता.