शीव उड्डाणपूल बंद झाल्यास शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय !
मुंबई – शीव उड्डाणपूल १ ऑगस्टपासून सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे. त्यामुळे पूर्व-पश्चिम प्रवास करणारे पालक-विद्यार्थी यांची तारांबळ उडणार आहे. धारावीतील अनेक मुलांच्या शाळा शीव, माहीम, माटुंगा, दादर परिसरात आहेत. पूल बंद झाल्यास पर्यायी मार्गाने पूर्ण वळसा घालून प्रवास करावा लागणार आहे. वाहतूक कोंडीही वाढण्याची शक्यता आहे.