गडचांदूर (चंद्रपूर) येथील बसस्थानकासमोर जिवंत बाँब !
चंद्रपूर – कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील बसस्थानकासमोरील भगवती कलेक्शनसमोर जिवंत बाँब आढळून आला आहे. पोलीस आणि बाँबशोधक पथक घटनास्थळी आल्यावर त्यांनी बाँबसदृश बॅगेची पडताळणी चालू केली. बाँब निकामी करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाचे बाँबविरोधी पथक गडचांदूरला जाण्यासाठी निघाले होते. ही बॅग कुणी ठेवली, याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.