आरक्षणाच्या प्रकरणी मोदी यांच्या निर्णयाला पाठिंबा !- उद्धव ठाकरे
मुंबई – आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचे अधिकार राज्याला नाहीत. मर्यादा वाढवायचीच असेल, तर संसदेतच हा निर्णय होऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर संसदेत तोडगा काढावा. पंतप्रधान मोदी आरक्षणप्रश्नी समाजहिताचा जो निर्णय घेतील, त्याला आमचा पाठिंबा असेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण याविषयी उद्धव ठाकरे यांची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी आंदोलकांनी केली होती. त्यानंतर ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली.
मराठा-धनगर-ओबीसी-आदिवासी या सर्व समाजांतील जाणत्या लोकांनी मोदींकडे जावे. मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देतांना किंवा धनगरांना एस्टी प्रवर्गातून आरक्षण देतांना संबंधित प्रवर्गाच्या मर्यादा वाढवायच्या असतील, तर त्याला शिवसेनेचा पाठिंबा असेल, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.