गुरुदेवा, आश्रय द्यावा तव चरणी ।
गुरुदेवा, आश्रय
द्यावा तव चरणी ।
गुरुदेवा (टीप),
शरणागत मी तव चरणी ।
अखंड नामात राहो वाणी ।। १ ।।
गुरुसेवा घडो जन्मोजन्मी ।
अस्तित्व विरघळो गुरुस्मरणी ।। २ ।।
शेवटी तुम्हा दीन विनवणी ।
आश्रय द्यावा तव चरणी ।। ३ ।।
(टीप – गुरुदेव : परात्पर गुरु डॉ. आठवले)
गुरुदेवा, तुम्हीच मला ‘जीवनात घडणार्या विविध प्रसंगांत ‘कर्ते-करविते तुम्हीच आहात’, याची जाणीव करून देता. ‘तुमच्या कोमल चरणी मला अखंड शरणागत रहाता येऊ दे’, ही कळकळीची प्रार्थना आहे.’
– सौ. मृणाल नानिवडेकर, अमेरिका (२४.२.२०२४)