५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली फोंडा, गोवा येथील कु. मैत्रेयी मिलिंद पोशे (वय १० वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. मैत्रेयी मिलिंद पोशे ही या पिढीतील एक आहे !

(‘वर्ष २०२४ मध्ये कु. मैत्रेयी मिलिंद पोशे हिची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के आहे.’ – संकलक)

कु. मैत्रेयी मिलिंद पोशे

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले


पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. सौ. शीतल मिलिंद पोशे (मैत्रेयीची आई), फोंडा, गोवा.

सौ. शीतल मिलिंद पोशे

१ अ. परिस्थिती स्वीकारणे : ‘कु. मैत्रेयी प्रत्येक परिस्थितीशी लगेच जुळवून घेते आणि आनंदी रहाण्याचा प्रयत्न करते. तिला खाण्या-पिण्यात आवड-नावड आहे, तरीही समोरची परिस्थिती पाहून ती प्रसाद म्हणून अन्न ग्रहण करते.

१ आ. समंजस : एकदा मी रुग्णाईत असतांना मैत्रेयीने वैद्यांना बोलावले आणि घरातील अन्य सदस्यांना कळवले. तिने मोठ्या व्यक्तीप्रमाणे हे दायित्व पार पाडले.

१ इ. सेवेची आवड : कोरोना महामारीच्या काळात आम्ही देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमाजवळ असलेल्या शिवमंदिराची स्वच्छता करत होतो. तेव्हा मैत्रेयी माझ्या समवेत नामजप करत आवारातील पालापाचोळा आणि काड्या गोळा करत असे.

१ ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती भाव : परात्पर गुरु पांडे महाराज यांनी देहत्याग केल्यावर मला पुष्कळ रडू येत होते. तेव्हा मैत्रेयी मला म्हणाली, ‘‘परात्पर गुरु पांडे महाराज सूक्ष्मातून आपल्या समवेत आहेत.’’

२. श्री. मिलिंद पोशे (मैत्रेयीचे वडील), सनातन आश्रम, देवद, पनवेल.

श्री. मिलिंद पोशे

२ अ. चांगली आकलनक्षमता : ‘कोणतेही स्तोत्र मैत्रेयीच्या लगेच स्मरणात रहाते. एखादे सूत्र २ – ४ वेळा वाचूनही तिच्या ते सूत्र स्मरणात असते.

२ आ. सेवेची आवड

२ आ १. मी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात भांडी घासण्याच्या सेवेला जात होतो. तेव्हा मैत्रेयी मला साहाय्य करत असे. ती बालसंस्कारवर्ग आणि आरती यांच्याशी संबंधित सेवा तळमळीने अन् भावपूर्ण करते.

२ आ २. गुरुपिठाच्या आवारातील केर गोळा करून स्वच्छता करणे : एकदा मैत्रेयी ७ दिवस तिच्या आईच्या समवेत त्र्यंबकेश्वर येथील गुरुपिठात गुरुचरित्र पारायणासाठी गेली होती. गुरुपिठाच्या आवारात तिला ‘प्लास्टिक’च्या बाटल्या किंवा केर दिसल्यास ती लहान मुलांना एकत्र करून स्वच्छता करत असे.

२ आ ३. भागवत पारायणाच्या ठिकाणी बालसाधकांच्या समवेत सेवा करणे : मैत्रेयी आणि तिची आई भागवत पारायणाला काशी येथे गेल्या होत्या. तेथे मैत्रेयीने सगळ्या बालसाधकांना एकत्र केले आणि एक गट बनवला. बालसाधक तेथील कचरा गोळा करत होते. ते भाविकांची पादत्राणे एका रांगेत लावून ठेवत होते. ते पारायणाला बसलेल्या व्यक्तींना पाणी देणे, केर काढणे इत्यादी सेवा करत होते.

२ इ. इतरांकडून होत असलेल्या अयोग्य कृतीची त्यांना जाणीव करून देणे : त्र्यंबकेश्वर येथील गुरुपिठात अन्नछत्र आहे. तेथे मैत्रेयी आणि तिची आई महाप्रसाद घेत असत. त्या कालावधीत सेवेकरी आणि भाविक पुष्कळ महाप्रसाद घेत असत आणि नंतर अन्न वाया घालवत असत. याविषयी मैत्रेयीच्या लक्षात आले. तेव्हा मैत्रेयीने याविषयी तेथील एका संतांना सांगितले. त्यानंतर त्यांनी सगळी दक्षता घेतली. त्या संतांनी मैत्रेयीचे कौतुक केले.

२ ई. राष्ट्र आणि धर्म यांच्या प्रती अभिमान : देवतांची छायाचित्रे किंवा राष्ट्रध्वज मार्गात पडला असल्यास ती गोळा करते आणि घरी आणते.

२ उ. नामजप आणि मंत्रपठण करणे : ती नित्यनेमाने स्वामी समर्थ यांचा नामजप ३ माळा, कुलदेव आणि कुलदेवी यांच्या नामजपाची १ माळ असा नामजप करते. ती स्तोत्र म्हणते आणि मंत्रपठण करते. ती स्वामींची आरती करते.

३. मैत्रेयीचे स्वभावदोष

राग येणे, उतावळेपणा आणि हट्टीपणा.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : ४.११.२०२३)


यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.