भगवंताच्या भेटीसाठी प्रत्येक श्वासासह नाम घेणे अगत्याचे !

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

आपण मनुष्य जन्माला आलो, ते भगवंतप्राप्ती करताच आलो. आतापर्यंत मी पुष्कळ योनी हिंडलो, भगवंताने आता मनुष्ययोनीत आणले. भगवंता, आता नाही तुला विसरणार. नाम घेतांना आपण पुष्कळदा त्याच्या मागे उपाधी लावतो, उदाहरणार्थ ‘मी नाम घेतो’, ही अहंकाराची भावना बाळगतो. या उपाधीमुळे आपल्या प्रगतीत बरेच अडथळे येतात. जगण्याकरता श्वास घेणे जसे मनुष्यास आवश्यक आहे, तसेच भगवंताच्या भेटीसाठी प्रत्येक श्वासासह नाम घेणे अगत्याचे आहे. – ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

(साभार : ‘पू. के.वि. बेलसरे – आध्यात्मिक साहित्य’ फेसबुक)