Kerala Nirmala College Namaz : एर्नाकुलम् (केरळ) येथील चर्च संचालित महाविद्यालयात मुसलमान विद्यार्थ्यांकडून नमाजपठणासाठी स्वतंत्र खोलीची मागणी
महाविद्यालय प्रशासनाचा नकार !
एर्नाकुलम् (केरळ) – येथील चर्च संचालित निर्मला महाविद्यालयात मुसलमान विद्यार्थ्यांनी नमाजपठणासाठी स्वतंत्र खोलीची मागणी केल्याने वाद निर्माण झाला आहे. महाविद्यालय प्रशासन आणि चर्च यांनी याला विरोध केला आहे. ‘नमाजपठणाला अनुमती दिली जाणार नाही’, असे चर्चने म्हटले आहे. ख्रिस्ती संघटनांनीही मुसलमान विद्यार्थ्यांच्या या मागणीला विरोध दर्शवला आहे.
महाविद्यालय प्रशासनाच्या अनुमतीविना केले नमाजपठण !
निर्मला महाविद्यालयाच्या प्रतीक्षालयामध्ये काही मुसलमान विद्यार्थिनींनी २६ जुलै या दिवशी नमाजपठण केले. तेथील कर्मचार्यांनी ही माहिती महाविद्यालयाच्या प्रशासनाला दिली. यानंतर प्रशासनाने विद्यार्थिनींना महाविद्यालयात नमाजपठण करण्यापासून रोखले. यानंतर मुसलमान विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात आंदोलन चालू केले आणि प्रतिदिन नमाजपठण करण्यासाठी महाविद्यालयात स्वतंत्र खोली देण्याची मागणी केली. काही विद्यार्थी संघटनाही मुसलमान विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ पुढे आल्या आहेत. मुसलमान विद्यार्थिनींनी सांगितले की, हा त्यांच्या धर्माचा भाग आहे आणि त्यांना स्वतंत्र खोलीची आवश्यकता आहे. (‘महाविद्यालये असो किंवा रुग्णालये तेथील मुसलमान हे प्रथम मुसलमान असतात आणि नंतर विद्यार्थी किंवा डॉक्टर असतात’, हे यावरून स्पष्ट होते. मुसलमान महिलांना त्यांच्या मशिदीमध्ये नमाजपठणासाठी प्रवेश निषिद्ध आहे; परंतु याच महिला धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली महाविद्यालये आणि इतर सार्वजनिक ठिकाणी नमाजपठणासाठी हट्ट धरतात, हा धर्मस्वातंत्र्याचा अतिरेक नाही का ? – संपादक)
१. महाविद्यालयाचे प्राचार्य जस्टिन कन्नन यांनी याला स्पष्ट नकार दिला. महाविद्यालय प्रशासनाने सांगितले की, ही एक धर्मनिरपेक्ष संस्था असून येथे कुणालाही नमाजपठण करण्याची अनुमती दिली जाऊ शकत नाही. जर त्यांना नमाजपठण करायचे असेल, तर त्यांना शुक्रवारी सुटी दिली जाईल, त्यांना केवळ लेखी अर्ज द्यावा लागेल.
२. सायरो मलबार चर्च आणि ‘कॅथॉलिक काँग्रेस’ यांनी यावर तीव्र आक्षेप नोंदवला. सायरो मलबार चर्चच्या सार्वजनिक व्यवहार समितीने म्हटले आहे की, ख्रिस्ती संस्थांमध्ये धार्मिक हस्तक्षेप करण्याच्या प्रयत्नांना विरोध केला जाईल. चर्चचे प्रमुख बिशप थरायल म्हणाले की, निर्मला महाविद्यालयातील घटनांमुळे येथील वातावरण बिघडले आहे. ही एक स्वायत्त संस्था आहे, जी स्वतःचे शैक्षणिक मानक राखते.
३. केरळमधील २ प्रमुख विद्यार्थी संघटनांनीही मुसलमान विद्यार्थ्यांच्या मागणीचे समर्थन करून महाविद्यालयातील वातावरण बिघडवले आहे.
४. कॅथॉलिक काँग्रेसने म्हटले आहे की, चर्चकडून चालवल्या जाणारी महाविद्यालये आणि शाळा यांमध्ये नमाजपठण करण्यासाठी कोणतीही खोली किंवा जागा दिली जाणार नाही.
या प्रकरणी कॅथॉलिक काँग्रेसने मौलवींना (इस्लामच्या धार्मिक नेत्यांना) मशिदींमध्ये महिलांसाठी जागा निर्माण करण्याचे आवाहन केले. (असे करण्याचे धाडस मौलवी दाखवतील का ? – संपादक)
जाणीवपूर्वक अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न ! – भाजप
नमाजपठणासाठी महाविद्यालयात खोली उपलब्ध करण्याच्या मुसलमान विद्यार्थ्यांच्या मागणीला भाजपने विरोध दर्शवला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन् यांनी ‘एक्स’वर पोस्ट प्रसारित करून म्हटले आहे की, केरळमधील हिंदु आणि ख्रिस्ती संस्थांमध्ये अराजकता निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्यांना धमक्या देऊन काँग्रेस आणि डाव्या संघटना यांनी त्यांचा खरा चेहरा दाखवून दिला आहे. या प्रकरणावर सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी भाजपने केली आहे.
संपादकीय भूमिका
|