Dharavi Arvind Vaishv : धारावी (मुंबई) : निशार शेख आणि आरिफ यांनी हिंदु तरुणाची धारदार शस्त्राने केली हत्या !

पोलीस मुसलमान आरोपींना पाठीशी घालत असल्याचा विश्‍व हिंदु परिषदेचा आंदोलनाद्वारे आरोप !

हिंदु तरुणाची हत्या

धारावी (मुंबई) – येथे निशार शेख आणि आरिफ यांच्यासह काही धर्मांध मुसलमानांनी अरविंद वैश्‍व या २७ वर्षीय हिंदु तरुणाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी ७ जणांपैकी दोघांनाच आरोपी दाखवल्याने विश्‍व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करून पोलिसांच्या विरोधात घोषणा दिल्या. ‘अन्वेषणात ज्यांची नावे उघड होतील, त्यांना आरोपी करण्यात येईल’, असे आश्‍वासन पोलिसांनी दिल्यानंतर विश्‍व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले. (पोलिसांच्या आश्‍वासनावर समाधान न मानता पोलीस सर्व आरोपींना पकडेपर्यंत हिंदूंनी त्यांचा पाठपुरावा घेतला पाहिजे ! – संपादक)

१. अरविंद कुटुंबियासह धारावीत रहात होता. त्याचा मित्र सिद्धेश आणि परिसरातील  तरुण अल्लू, आरिफ आणि शेरअली यांच्यात भांडण चालू होते. अरविंद त्यांचे भांडण सोडवण्यासाठी घटनास्थळी गेला. तेव्हा तिघांनी त्याला अमानुष मारहाण केली.

२. या प्रकरणाची तक्रार देण्यासाठी सिद्धेश आणि अरविंद हे दोघे पोलीस ठाण्यात गेले. तेव्हा निशार शेख, आरिफ आणि इतर सहकार्‍यांनी अरविंदच्या छातीत धारदार शस्त्राने वार केले. त्यात अरविंदचा दुर्दैवी मृत्यू झाला. (या वेळी पोलीस काय करत होते ? – संपादक)

३. या प्रकरणी धारावी पोलिसांनी तात्काळ निशार आणि आरिफ यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली.

४. अरविंदला ६ ते ७ जणांनी मिळून मारले; पण तक्रारीत दोघांचीच नावे घेतल्याने पोलीस आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप करून विश्‍व हिंदु परिषदेच्या ५० ते ६० कार्यकर्त्यांनी धारावी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले. या वेळी पोलिसांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.

अंत्यसंस्काराच्या वेळीही मुसलमानांच्या हिंदूंच्या विरोधात घोषणा !

अरविंद वैश्य यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळीही वाद घालण्यात आला. स्थानिक मुसलमानांनी हिंदूंच्या विरोधात घोषणा दिल्याचे समजते. त्यामुळे येथे तणावपूर्ण वातावरण आहे. पोलिसांचाही बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

बहुसंख्यांक हिंदूंच्या देशात हिंदू असुरक्षित असणे, हे हिंदूंसाठी लज्जास्पद ! आणखी अशा किती हत्या झाल्यावर हिंदू संघटित होणार आहेत ?