रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या चंडीयागाच्या वेळी श्री. अतुल दिघे यांना आलेल्या अनुभूती
‘२८ ते ३०.५.२०२४ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८२ व्या जन्मोत्सवानिमित्त रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात चंडीयाग झाला. मी संगणकीय प्रणालीद्वारे याग बघत होतो. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती पुढे देत आहे.
१. त्रासदायक अनुभूती
चंडीयागाच्या प्रथम दिवशी पुरोहित साधकांनी मंत्रपठण चालू केल्यावर मला जांभया येऊ लागल्या. माझ्या शरिरातून पुष्कळ मोठ्या प्रमाणात त्रासदायक शक्ती बाहेर पडत होती. हे अर्धा घंटा चालू होते. मी कितीही प्रयत्न केले, तरी माझे डोळे आपोआप बंद होत होते.
२. चांगल्या अनुभूती
अ. मला त्रास होत असूनही माझे लक्ष मंत्रपठणावर केंद्रित होत होते.
आ. यागाच्या विधी होत असतांना श्री. निषाद देशमुख (वर्ष २०२४ ची आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) आणि श्री. विनायक शानबाग (वर्ष २०२४ ची आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४१ वर्षे) हे साधक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अवतारत्वाविषयी अधूनमधून माहिती सांगत होते. तेव्हा मला माझ्या जीवनात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे सर्वांत प्रथम दर्शन झालेले दृश्य डोळ्यांसमोर आले.
इ. मला सेवेनिमित्त सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या वेळोवेळी झालेल्या भेटी आठवून त्यांची वाणीही ऐकू येत होती.
वरील सर्व अनुभूती मला यागाच्या तीनही दिवस आल्या. याबद्दल मी संपूर्ण शरण जाऊन सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. अतुल दिघे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.६.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |