पुणे येथे चारित्र्यावर संशय घेत महिला पोलीस कर्मचार्याच्या हत्येचा प्रयत्न करणार्या पतीला अटक !
पुणे – चारित्र्यावर संशय घेत पतीने महिला पोलीस कर्मचार्याची गळा दाबून हत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना २७ जुलैला पहाटे विश्रांतवाडी परिसरात घडली. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी महिला पोलीस कर्मचारी रोहिणी भोकसे-पानसरे यांच्या तक्रारीवरून पती हर्षद पानसरे याला अटक केली आहे. त्यांचा पती हर्षद हा रोहिणी यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना शिवीगाळ करत होता. हर्षद आणि रोहिणी यांच्यात पुन्हा वाद झाला. त्या वेळी पतीने रोहिणी यांचा गळा आणि तोंड दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केला, तसेच मारहाण करून सामाजिक माध्यमावर अपकीर्तीकारक संदेश पाठवण्याची धमकी दिली.