इस्रायलकडून बोध घेणार का ?

इस्रायल आणि संघर्ष हे समीकरण आहे. शत्रूराष्ट्रांनी वेढलेला हा देश गेली २ वर्षे जिहादी आतंकवादाला मोठ्या निकराने तोंड देत आहे. अशा वेळी तेथील महिलाही कुटुंबाच्या रक्षणासाठी सज्ज होत आहेत. हिंदूंवर सातत्याने होणार्‍या जिहाद्यांचे विविध प्रकारचे आघात पहाता भारताची स्थितीही काही वेगळी नाही. येत्या काळात हे आघात उत्तरोत्तर वाढत जाणार आहेत. त्यामुळे भारत सरकार आणि नागरिक यांनी इस्रायलकडून ‘प्रखर राष्ट्रवादा’चा बोध घ्यायला हवा !

इस्रायलने आक्रमण केल्याविषयीचे संग्रहित छायाचित्र

१. इस्रायलमध्ये बंदुक बाळगण्याचे कायदे शिथिल

गेल्या वर्षी ७ ऑक्टोबरला हमासने केलेल्या अभूतपूर्व आक्रमणाच्या धक्क्यातून आजही न सावरलेल्या इस्रायली नागरिकांमध्ये सुरक्षेविषयी चिंता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर इस्रायली महिला आणि इस्रायलचे विद्यमान सरकार मात्र सुरक्षेविषयी उपाययोजनात्मक पावले उचलत आहेत. बेंजामिन नेत्यान्याहू यांच्या नेतृत्वाखालील इस्रायली सरकारचे संरक्षणमंत्री इटामार बेन गवीर यांनी बंदुक बाळगण्याच्या संदर्भातील कायदे शिथिल केले.

श्रीमती धनश्री देशपांडे

२. बंदुकीच्या परवान्यासाठी महिलांच्या अर्जांत वाढ

शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण घेण्यासाठी बंदुकीची अनुमती घेणे सरकारने अनिवार्य केले आहे. त्यानंतर बंदुक ठेवण्याच्या परवान्यासाठी अर्ज करणार्‍या महिलांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. इस्रायली संरक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार ४२ सहस्र महिलांनी बंदुकीच्या परवान्यासाठी अर्ज केले आहेत; त्यांपैकी १८ सहस्रांहून अर्ज सरकारने संमत केले आहेत. युद्धापूर्वी महिलांकडे असलेल्या बंदुकीच्या परवान्यांच्या संख्येपेक्षा ही संख्या तिप्पट आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार इस्रायल आणि इस्रायलव्याप्त ‘वेस्ट बँक’मधील १५ सहस्रांहून अधिक महिलांकडे स्वत:च्या बंदुका आहेत. त्यांपैकी १० सहस्र सक्तीच्या प्रशिक्षणासाठी नोंदणीकृत आहेत.

प्रखर राष्ट्रवादामुळे प्रतिकूल स्थितीत टिकून राहिलेले राष्ट्र !

अरब-इस्रायल संघर्षाला केवळ राजकीय वाद म्हणून नव्हे, तर धार्मिक विवाद म्हणूनही पाहिले जाते. सोप्या भाषेत सांगायचे असेल, तर जसे अमेरिका आणि अफगाणिस्तान या वादात तालिबान ही एक संघटना होती, तसेच इस्रायल आणि पॅलेस्टाईन वादात ‘हमास’ या जिहादी संघटनेची भूमिका आहे. इस्रायल एक असा देश ज्याच्या चारही बाजूंना फक्त शत्रूराष्ट्र किंवा अस्थिरता पसरलेली आहे. नैसर्गिक आव्हाने आणि प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढून इस्रायल आर्थिकदृष्ट्या जगातील सर्वांत सामर्थ्यवान, आधुनिक संरक्षण साधनांनी युक्त आणि स्थिर देशांपैकी एक आहे. याला कारण एकच ‘प्रखर राष्ट्रवाद’ ! इस्रायली नागरिकांचा ‘प्रखर राष्ट्रवाद’ हा देशाला सामर्थ्यवान बनवण्यास साहाय्य करतो.
– श्रीमती धनश्री देशपांडे

३. कुटुंबाच्या रक्षणासाठी शस्त्र खरेदी करण्याचा महिलांचा विचार

लिमोर गोनेन या इस्रायली महिलेने तिचे मत मांडतांना म्हटले आहे, ‘त्यांनी शस्त्रे खरेदी करण्याचा किंवा परवाना घेण्याचा कधी विचार केला नव्हता; परंतु ७ ऑक्टोबरनंतर गोष्टी पालटल्या आहेत. तेव्हा सर्वांना लक्ष्य करण्यात आले होते, त्यामुळे ‘कुटुंबाचे संरक्षण व्हावे’, ही त्यांची पहिली प्राथमिकता आहे.’

४. शत्रूराष्ट्रांनी वेढलेले संघर्षमय जीवन जगणारे राष्ट्र

छोट्याशा इस्रायलचा विचार केल्यास इस्रायल हा जेमतेम ९३ लाख लोकसंख्येचा देश. एकमेव ‘ज्यू’ राष्ट्र आणि त्याच्या चारही बाजूला शत्रूराष्ट्रे ! विश्वयुद्धानंतर ज्यूंसाठी इस्रायल देशाची स्थापना केली गेली; मात्र इजिप्त, सीरिया, जॉर्डन आणि इराक या अरब देशांनी इस्रालयच्या निर्मितीला विरोध करत वर्ष १९४९ मध्ये इस्रायलवर आक्रमण केले. न्यूनाधिक प्रमाणात तेव्हापासूनच हा संघर्ष चालू आहे. अनेक युद्धे आणि दंगली यांमुळे जागतिक स्तरावर ज्यू धर्मियांची संख्या अत्यंत न्यून झालेली आहे.

५. इस्रायलमधील सक्तीची सैन्य सेवा

इस्रायलमध्ये प्रत्येक नागरिकास (काही अपवाद वगळता) काही काळासाठी सैन्यामध्ये भरती व्हावे लागते. पुरुषांसाठी ३ वर्षे, तर स्त्रियांसाठी २ वर्षांची सैन्य सेवा तिथे सक्तीची आहे, तसेच परदेशी आक्रमण किंवा देशांतर्गत आणीबाणीच्या परिस्थितीत सरकार सामान्य नागरिकांना सैन्यामध्ये पुन्हा बोलावून घेऊ शकते. यामुळे देशाची सुरक्षाव्यवस्था मजबूत व्हायला साहाय्य होते, तसेच नागरिकांमध्ये शिस्त निर्माण होते.

६. इस्रायल आणि भारत यांतील साम्य

आता ‘इस्रायलचा राष्ट्रवाद सांगण्याची आवश्यकता काय ?’, असा प्रश्न पडू शकतो; मात्र एकंदरीतच भारत आणि इस्रायल या दोनही देशांचा राष्ट्र अन् धर्म यांच्या अस्तित्वासाठी असलेला लढा एकसमान असून अनेक वर्षांपासून चालू आहे. भारताच्याही तिन्ही बाजूंना शेजारची मुसलमान राष्ट्रे आहेत, तसेच शेजारी राष्ट्रांत साम्राज्यवादी चीनसारखा शत्रूही आहेच. त्याविषयी आता अधिक सांगणे न लागे. त्यामुळे भारतालाही इस्रायलप्रमाणेच आर्थिक आणि सामरिक दृष्टीने सामर्थ्यवान होण्याची आवश्यकता आहे.

इस्रायलचा आदर्श भारतीय घेतील का ?

काळाच्या पडद्याआड दडलेले भारतवर्षाचे भविष्य जाणून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी नेहरूंना ‘इस्रायलशी मैत्री करा’, असा सल्ला दिला होता; पण… असो. नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत की, जे स्वतः इस्रायलमध्ये गेले आणि त्यांनी त्याच्याशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केले. विद्यमान पंतप्रधानांनी भारत आर्थिक आणि सामरिक दृष्टीने सामर्थ्यवान होण्याच्या दिशेने गेल्या दशकांत अनेक पावले उचलली आहेत; मात्र भारतीय जनतेनेही स्वतःमध्ये राष्ट्रवादी दृष्टीकोन निर्माण आणि वृद्धिंगत करणे आवश्यक आहे. भारतामध्ये गेल्या कित्येक दशकांपासून आतंकवाद फोफावला आहे. भारताला इस्लामी राष्ट्र बनवू इच्छिणार्‍यांनी पदोपदी उच्छाद मांडला आहे. त्यांचा बीमोड करण्यासाठी सरकारसमवेतच भारतीय जनतेने युद्धसज्ज होणे अत्यंत आवश्यक आहे. इस्रायलसारख्या छोट्या देशातील महिला शत्रूराष्ट्राशी युद्ध करण्यासाठी ज्याप्रमाणे युद्धसज्ज होत आहेत, तीच भूमिका आज भारतीय महिलांनी घेणे क्रमप्राप्त आहे.
– श्रीमती धनश्री देशपांडे

७. भारताला अंतर्गत हितशत्रूंशी दोन हात करावे लागणार आहेत !

गेल्या ७-८ शतकांपासून भारतीय स्त्रियांवर धर्मांधांकडून अनन्वित अत्याचार होत आहेत. आजही घडणार्‍या घटनांचा मागोवा घेतल्यास असे लक्षात येईल की, ९० टक्के घटनांमध्ये भारतीय स्त्रियांवर अत्याचार करणारे धर्मांधच असतात. अत्यंत क्रूरपणे भारतीय महिलांच्या शरिराची विटंबना, बलात्कार करून मुलींची हत्या केली जाते. खोटी हिंदु नावे धारण करून मुलींना नादाला लावून त्यांना लव्ह जिहादमध्ये फसवले जाते. हिंदूंच्या धार्मिक उत्सवाला उघडपणे विरोध, देवतांच्या मिरवणुकांची अडवणूक, क्षुल्लक कारणावरून हिंदूंच्या हत्या, राष्ट्रीय कार्यक्रमात ‘वन्दे मातरम्’ न म्हणणे इतकेच काय, तर भारतीय संसद भवनात खासदारकीची शपथ घेतांना ‘जय पॅलेस्टाईन’ म्हणेपर्यंत धर्मांधांची मजल गेली आहे. या उद्गारांचे समर्थन करणार्‍या या आणि अशा अनेक घटना आपण वृत्तपत्रातून वाचत असतो. याचा अर्थ स्पष्ट आहे, ‘आम्हा भारतियांना केवळ बाहेरील शत्रूराष्ट्रांशी युद्ध करावे लागेल, असे नाही, तर भारतात राहून देशाचे अन्न, पाणी, सामुग्री, तसेच अनेक योजना पदरी पाडून घेणार्‍या अंतर्गत हितशत्रूंशीही दोन हात करावे लागणार आहेत.’

८. देव, देश आणि धर्म यांसाठी सर्वोच्च बलीदानाची सिद्धता हवी !

पूर्वी भारतामध्ये यवनांविरुद्धच्या अनेक युद्धांमध्ये स्त्रिया-पुरुष बरोबरीने लढत असत. यवनांनी आपला अपलाभ घेऊ नये म्हणून सहस्रो स्त्रियांनी जोहार केला आणि मृत्यूला कवटाळले. केवळ शील आणि धर्म रक्षण यांसाठी सहस्रो स्त्रियांनी बलीदान दिल्याचा आपला इतिहास आहे. आज मात्र प्रलोभनांना भुलून हिंदु स्त्रिया मुली स्वतःहून यवनांच्या स्वाधीन होतांना दिसतात. हे थांबायला हवे ! या युद्धासाठी भारतियांना केवळ शारीरिकच नाही, तर मानसिक आणि आध्यात्मिक बळाची आवश्यकता पडणार आहे. त्यासाठी भारतीय जनतेला प्रथम धर्मशिक्षण घेणे, राष्ट्ररक्षण, तसेच धर्मजागृती यांसाठी एकमेकांना प्रवृत्त करणे, स्वसंरक्षणासाठी युद्धकौशल्य शिकणे या गोष्टी अत्यंत डोळसपणे आचरणात आणाव्या लागतील. आज तीच लढण्याची मानसिकता, तसेच देव, देश आणि धर्म यांसाठी तन, मन, धन आणि प्राण त्याग करण्याची सिद्धता प्रत्येक भारतीय नागरिकामध्ये निर्माण व्हायला हवी.

– श्रीमती धनश्री देशपांडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.