‘सुरक्षित बहीण’ योजनेची आवश्यकता ! – योगेश चिले, प्रवक्ते, मनसे

योगेश चिले, प्रवक्ते, मनसे

पनवेल – महाराष्ट्रात या आठवड्यात २ लाडक्या बहिणींचे निर्घृण खून झाले. या बहिणींना तुम्ही दीड सहस्र रुपये देत आहात; पण त्यांना त्याची आवश्यकता नाही. ते त्या कमावून आणू शकतात; पण त्या जिथे नोकरीला जातात किंवा त्या जिथे शिक्षण घेतात, तिथे त्यांना सुरक्षित वातावरण देणे, ही आजची आवश्यकता आहे. ही सुरक्षा तुम्ही दिली पाहिजे, अशी प्रतिक्रिया मनसेचे प्रवक्ते योगेश चिले यांनी व्यक्त केली आहे. उरण येथील लव्ह जिहादच्या घटनेच्या संदर्भाने त्यांनी या प्रतिक्रियेचा व्हिडिओ प्रसारित केला आहे.

ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या ‘धर्मवीर’ भाग १ आणि २ या दोन्ही चित्रपटांत आनंद दिघे यांचे दोन्ही हात राख्यांनी भरलेले दाखवण्यात आले. उद्देश हाच की, ते बहिणींचे रक्षण करायचे. मुख्यमंत्री हे आनंद दिघे यांचे शिष्य आहेत. त्यामुळे त्यांनी ‘लाडकी बहीण’ ही योजना आणली; पण महिलांना आज सुरक्षेची अधिक आवश्यकता आहे.