वर्धा येथे गर्भवतींचा ‘रँप वॉक’
वर्धा – टेस्ट ट्यूब बेबीद्वारे (कृत्रिम गर्भधारणेद्वारे) गर्भवती झालेल्या महिलांसाठी येथे ‘अभिनव फॅशन शो’चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये २३ गर्भवती माता सहभागी झाल्या होत्या. स्पर्धेच्या पहिल्या फेरीत गर्भवती मातांनी ‘रँप वॉक’ (मंचावरून विशिष्ट हावभाव करत चालणे) केले, तर दुसर्या फेरीत स्त्रीत्व आणि मातृत्व यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. विजेत्या मातांना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
संपादकीय भूमिका :गर्भवतींकडून ‘रँप वॉक’ किंवा बेबी बंप (गर्भ) दाखवत एकप्रकारचा दिखाऊपणा किंवा थिल्लरपणा, तसेच पाश्चात्त्यांचे अंधानुकरण केले जाणे याला संस्कृतीची झालेली अधोगती कारणीभूत ! |