देशभक्तांनी आज संघटित होण्याची आवश्यकता !

हिंदुस्थानातील आजचे वातावरण धगधगायमान झालेले असून त्यात कशाची आहुती पडणार आहे, ते काही आज सांगता येत नाही. अशा वेळी कुणाही राष्ट्रीय तरुणाचे मन स्वस्थ रहाणे, हे केवळ अशक्य आहे. ‘इतके भयंकर घडत असतांना मी त्यापासून दूर, स्वस्थ कसा राहू ?’, असा प्रश्न प्रत्येक देशभक्त अंत:करणात निर्माण होत आहे. हे अगदी नैसर्गिक, सहजसुलभ नि योग्यच आहे ते ! परंतु संघटनेच्या शास्त्रशुद्ध स्वरूपावर ज्यांचा विश्वास आहे किंवा त्या मार्गाचे रहस्य समजून घेण्याची ज्यांची प्रामाणिक इच्छा आहे, अशांनी संघटित व्हायला हवे !

(साभार : ‘अज्ञातांची वचने’ या पुस्तकातून, संचालक : श्री. अमरेंद्र गाडगीळ)