Islamic State Tramadol : इस्लामिक स्टेटचे आतंकवादी उशिरापर्यंत जागे रहाता येण्यासाठी करतात ‘ट्रामाडॉल’ या गोळ्यांचा वापर

मुंद्रा (गुजरात) बंदरात ११० कोटी रुपयांच्या ६८ लाख ‘ट्रामाडॉल’ गोळ्या जप्त !

इस्लामिक स्टेटचे आतंकवादी

कच्छ – गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील मुंद्रा बंदरावर सीमाशुल्क विभागाने दोन कंटेनरमधून ६८ लाख ‘ट्रामाडॉल’ गोळ्या जप्त केल्या आहेत. त्यांची किंमत ११० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. हे ड्रग पश्‍चिम आफ्रिकन देश सिएरा लिओन आणि नायजर येथे  निर्यात केले जात होते. ‘ट्रामाडॉल’ हे फायटर ड्रग म्हणून ओळखले जाते. इस्लामिक स्टेटचे आतंकवादी उशिरापर्यंत जागे रहाण्यासाठी या गोळ्यांचा वापर करतात.

सीमाशुल्क विभागाच्या अधिकार्‍यांना कंटेनरच्या पुढील भागात या गोळ्या सापडल्यानंतर त्याची सखोल पडताळणी करण्यात आली.  या वेळी ‘ट्रॅमाकिंग-२२५’ आणि ‘रॉयल-२२५’, असे बनावट लेबल लावलेली औषधांची खोकी आढळून आली. दोन्हीमध्ये २२५ मिग्रॅच्या ‘ट्रामाडॉल हायड्रोक्लॉराइड’च्या गोळ्या. या खोक्यावर  उत्पादकाचा तपशील नव्हता.

या प्रकरणी राजकोट, गांधीनगर आणि गांधीधाम येथे शोध चालू आहे. आफ्रिकन देश नायजर आणि घाना येथे ‘सिंथेटिक ओपिओइड’ औषधांना मोठी मागणी आहे.