Jamaat E Islami : बांगलादेशात आरक्षणावरून झालेल्या हिंसाचारामागे पाकिस्तानच्या ‘जमात-ए-इस्लामी’ संघटनेचा हात !

बांगलादेशातील हिंसाचार

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशात आरक्षणाच्या सूत्रावरून झालेल्या हिंसक आंदोलनामागे पाकिस्तानातील ‘जमात-ए-इस्लामी’ या संघटनेचा हात असल्याचे समोर आले आहे. आंदोलनात मारल्या गेलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ५ सहस्र टका (अनुमाने ३ सहस्र ५०० रुपये) आणि एका पोलीस कर्मचार्‍याला मारण्यासाठी १० सहस्र टका (अनुमाने ७ सहस्र रुपये) सुपारी देण्यात आली होती, असे गुप्तचरांनी दिलेल्या माहितीतून उघड झाले आहे. हे आंदोलन बांगलादेशातील विरोधी पक्ष ‘बांगलादेश नॅशनल पार्टी’ची (‘बी.एन्.पी.’ची) विद्यार्थी संघटना असलेल्या ‘युवा दला’कडून करण्यात आले होते.

आंदोलनाचा कट लंडनमध्ये रचला गेला. तेथे बी.एन्.पी.चा प्रमुख तारिक रहमान रहातो. त्याने लंडनमध्ये पाकिस्तानी हस्तकांशी संबंध ठेवून पैसे गोळा करून ते ढाका येथील सुलतान नावाच्या व्यक्तीला पाठवले. या पैशांतून हिंसाचार करण्यात आला. बांगलादेश पोलिसांनी सुलतान याला अटक केली आहे.

संपादकीय भूमिका

जो पाकिस्तान अन्य इस्लामी देशांमध्येही कारवाया करतो, तो हिंदुबहुल भारतात कारवाया केल्याविना कधीतरी राहू शकेल का ?