नालासोपारा येथे २५ महिलांशी विवाह करणार्या धर्मांधाला अटक !
|
मुंबई – ‘शादी डॉट कॉम’ यासह विवाह संस्थेच्या संकेतस्थळांवरून घटस्फोटित किंवा विधवा अशा २५ हून अधिक महिलांना हेरून त्यांच्याशी ओळख करणार्या आणि त्यांच्याशी जवळीक साधून, त्यांची आर्थिक फसवणूक करून खोटे लग्न रचणार्या धर्मांधाला पोलिसांनी अटक केली आहे. फिरोज नियाज शेख असे त्याचे नाव आहे. नालासोपारा येथील एका महिलेच्या तक्रारीवरून त्याला पोलिसांनी कह्यात घेतले.
नालासोपार्यातील एका महिलेची संकेतस्थळावरून फिरोजशी ओळख झाली. या ओळखीतून फिरोजने तिच्याशी लग्न केले. त्यानंतर तिच्याकडून त्याने भ्रमणसंगक आणि ६ लाख ५० सहस्र ७९० रुपये घेऊन पळ काढला. या प्रकरणी महिलेने त्याच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली. यानंतर पोलिसांनी त्याला कह्यात घेऊन वसई न्यायालयात उपस्थित केल्यावर त्याला २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अशा प्रकारे त्याने २५ हून अधिक महिलांसमवेत विवाह करून त्यांची फसवणूक केली आहे. त्यांचे दागिने घेऊनही तो पसार होत असे. फिरोजला अटक केल्यानंतर त्याच्याकडून ३ लाख २१ सहस्र ४९० रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. त्यात अनेक महिलांचे एटीएम् कार्ड, चेकबूक, ६ भ्रमणभाष, १ भ्रमणसंगणक, पॅन कार्ड, क्रेडिट कार्ड, सोने-चांदीचे दागिने इत्यादींचा समावेश आहे. (उद्दाम धर्मांधाने वशीकरणाने एवढ्या महिलांना फसवले तर नसेल ना ? हे पहाणे आवश्यक ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|