विशाळगडावरील अतिक्रमणे वेळेत न काढणार्या अधिकार्यांवर कारवाई करण्याच्या संदर्भात मंचर (पुणे) येथे निवेदन !
मंचर (पुणे) – विशाळगडावरील अतिक्रमणे वेळेत न काढणार्या अधिकार्यांवर कारवाई करावी आणि निरपराध हिंदूंवर नोंद केलेले गुन्हे मागे घ्यावे, यासाठी मंचर येथील प्रांत कार्यालयात निवेदन देण्यात आले. या वेळी रणरागिणी शाखेच्या कु. काजल वाघ, धर्माभिमानी सर्वश्री आकाश वाघ, हेमंत थोरात, अनिल राक्षे, उद्योजक श्री. शंकर शेठ पटेल, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री निवृत्ती डोके आणि ओंकार देणे यांनी नायब तहसीलदार श्री. मुंडे यांच्याकडे निवेदन दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह शाखेचे तहसीलदार श्री. बाळासाहेब शिरसाट यांनाही हे निवेदन देण्यात आले. या वेळी धर्मप्रेमी सर्वश्री अजित राठोड, सुरेंद्र महाजन, हिंदु जनजागृती समितीच्या शाखेतील सदस्य श्री. आकाश जाधव, श्री. अनिल दोनवडे, धर्मप्रेमी कु. अंजली जवळकर, श्री. सचिन घुले आदी उपस्थित होते. जनतेची दिशाभूल करणार्या दोषी अधिकार्यांवर कारवाई करावी, यासाठी हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी संघटनांचे कार्यकर्ते यांनी निवेदन दिले. ‘कह्यात घेतलेल्या निरपराध हिंदूंना मुक्त करावे, तसेच विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याची चालू झालेली मोहीम सर्व अतिक्रमणे हटवून पूर्ण करावी’, अशी मागणी या वेळी निवेदनाद्वारे करण्यात आली.