महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ आमदारांनी घेतली शपथ !
मुंबई – महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ सदस्यांनी २८ जुलै या दिवशी आमदारकीची शपथ घेतली. उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी सर्व सदस्यांना आमदारकीची शपथ दिली. भाजपच्या पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, डॉ. परिणय फुके, अमित गोरखे, योगेश टिळेकर, शिवसेनेच्या भावना गवळी, कृपाल तुमाने, काँग्रेसच्या डॉ. प्रज्ञा सातव, उद्धव ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजी गर्जे आणि राजेश विटेकर अशी नवनियुक्त आमदारांची नावे आहेत. १२ जुलै या दिवशी झालेल्या निवडणुकीमध्ये वरील आमदार निवडून आले.