उद्धव ठाकरे पक्षाचे करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांच्याकडून गरजूंना छत्र्यावाटप !
कोल्हापूर – पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे पक्षाचे करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांच्याकडून परिसरातील १०० गरजू आणि ज्येष्ठ नागरिक यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. गेली अनेक वर्षे हा उपक्रम चालू आहे. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. बाबासाहेब भोपळे यांनी उपस्थितांना ‘जीवनातील साधनेचे महत्त्व’ यावर मार्गदर्शन केले.
या प्रसंगी जिल्हाप्रमुख श्री. संजय पवार, सर्वश्री दीपक रेडेकर, विक्रम चौगुले, विराग करी, अरविंद शिंदे, सुनील चौगुले, शरद माळी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी उपस्थित होते.