भारतीय विद्यार्थ्यांच्या मनावर कोरलेला ‘कॅमलिन’चा कालातीत वारसा !
भारतीय शिक्षण क्षेत्रातील वेलबुट्टीदार कापडावर आता वयाने ६० वर्षे असलेल्यांच्या मनांना जोडणारा ‘कॅमलिन’ हा प्रसिद्ध धागा आहे. जेव्हा हे लोक आपल्या शैक्षणिक प्रवासाविषयी सांगतात तेव्हा त्यांचे ‘कॅमलिन’च्या उत्पादनांविषयी असलेले भावनिक नाते निर्विवाद आहे, हे स्पष्ट जाणवते. हे लोक म्हणतात, ‘‘शाळेच्या पहिल्या दिवशी अगदी नवीन ‘कॅमलिन पेन्सिल’ किंवा ‘बॉलपेन’ हातात धरल्याचा तो क्षण आम्ही कसा विसरू शकतो ? या लिहिण्याच्या सामुग्रीला केवळ उपकरण म्हणण्याहून अधिक किंमत होती; कारण स्वतःचे सुप्त ज्ञान आणि स्वतःचे म्हणणे सांगणे यांचे दरवाजे उघडण्याच्या त्या चाव्या होत्या.’’ बहुतेक लोकांचा शैक्षणिक प्रवास ‘कॅमलिन’ची उत्पादने वापरून चालू झाला. त्यामुळे ‘कॅमलिन’ हे पुढील शैक्षणिक मार्गाचे मूर्त चिन्ह ठरले.
जसजशी वर्षे गेली, तसतसा ‘कॅमलिन’ हा विद्यार्थ्यांचा सततचा मित्र राहिला. प्राथमिक शाळेत मुळाक्षरे काढण्यापासून उच्च शिक्षणातील कठीण आणि गुंतागुंतीची समीकरणे सोडवण्याच्या प्रत्येक पायरीपर्यंत ‘कॅमलिन’ची उत्पादने त्यांच्या साथीला होती. विद्यार्थ्यांच्या लहानपणापासून प्रौढत्वापर्यंतच्या प्रवासामध्ये या उत्पादनांनी सुविधा निर्माण केली. जे सध्या आता वयाच्या ५० वर्षांच्या पुढे आहेत, त्यांच्यासाठी ‘कॅमलिन’ हा एक ‘ब्रँड’ (व्यापारी चिन्ह) नसून त्यांच्या आठवणीचे भांडार आहे. थोडक्यात सांगायचे झाले, तर ‘कॅमलिन’ची आठवण हृदयात ठेवली पाहिजे, अशी आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये शाश्वत प्रभाव असलेली दर्जेदार उत्पादने हे ‘कॅमलिन’चे प्रमाणपत्र असून आमच्या आयुष्यातील परिवर्तन घडवून आणणार्या या उपकरणांशी आमचा दृढ संबंध आहे. ‘कॅमलिन’ या प्रख्यात ब्रँडचे संस्थापक सुभाष दांडेकर यांचे नुकतेच वयाच्या ८६ व्या वर्षी दुःखद निधन झाले. हा ब्रँड जपानच्या ‘काकुयो’ या आस्थापनाला विकल्यानंतर ते ‘एमेरीटस’ (सन्माननीय पद) अध्यक्ष म्हणून काम पहात होते.
– श्री. नारायण नाडकर्णी, फोंडा, गोवा.