अल्पवयीन, शालेय, महाविद्यालयीन युवक-युवतींना खोल्या उपलब्ध करून देणारे हॉटेल आणि वसतीगृहे यांच्यावर कठोर कारवाई करा !

हिंदु जनसंपर्क कार्यालयाची निवेदनाद्वारे नाशिक पोलिसांकडे मागणी !

पोलीस उपायुक्तांना निवेदन देतांना कार्यकर्ते

नाशिक – हॉटेल, तसेच वसतीगृहे येथे खोल्या घेऊन हिंदु मुलींवर अत्याचार होत आहेत. तसेच युवा पिढी वाममार्गाला जाऊन असंख्य मुलींचे आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त होऊन  कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. अल्पवयीन, शालेय, महाविद्यालयीन युवक-युवतींना खोल्या उपलब्ध करून देणारे ‘रॉयल इन’सह सर्व हॉटेल आणि वसतीगृह यांच्यावर कठोर कारवाई करा, अशी मागणी हिंदु जनसंपर्क कार्यालयाद्वारे नाशिक येथील पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्याकडे करण्यात आली.

मुंबई-आग्रा महामार्गावर, भुजबळ फार्मलगत असलेल्या ‘रॉयल इन’ हॉटेलच्या खोलीत एका अल्पवयीन मुलीला डांबून मारहाण करत असल्याचा व्हिडिओ एका धर्मांध मुलाने त्याच्या ‘इन्स्टाग्राम’ या समाजमाध्यमावरून प्रसारित केला. काही सूज्ञ युवकांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत याविषयी पोलिसांना कळवल्यावर पोलिसांनी या अल्पवयीन मुलीला त्या नराधमाच्या तावडीतून सोडवत मुंबई नाका पोलीस ठाण्यात नेले. त्या नराधमाला अटक केली आणि अंबड पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद केला.

या मागणीचे निवेदन देतांना हिंदु जनसंपर्क कार्यालयाचे प्रमुख श्री. सागर देशमुख, तसेच सर्वश्री नाना दंडगव्हाळ, पंकज भिंगारे, राजेंद्र चव्हाण, प्रसाद कोलते, सचिन शिकारे, धीरज जोशी, राहुल मोराडे, विलास सनानसे, हर्षल फुलदेवरे, सचिन जोंधळे, राहुल सूर्यवंशी, जयवंत पवार, संदीप सोनवणे आदी उपस्थित होते.