चि. आदिनाथ दत्तात्रय फोकमारे याचे श्लोक स्पर्धेतील सुयश !
यवतमाळ, २७ जुलै (वार्ता.) – येथील स्काय इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने श्लोक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत चि. आदिनाथ दत्तात्रय फोकमारे (वय ७ वर्षे) याने द्वितीय क्रमांक मिळवला. या वेळी त्याने भगवान श्रीकृष्णाचा ‘कृष्णाय वासुदेवाय’ हा श्लोक म्हटला होता.