Gujrat VHP Member Attacked : भुज (गुजरात) येथे विहिंपच्या कार्यकर्त्यावर धर्मांध मुसलमानांकडून प्राणघातक आक्रमण
भुज (गुजरात) – येथेे विश्व हिंदु परिषदेच्या (VHP) भावेश परमार या कार्यकर्त्यावर २ मुसलमान तरुणांनी प्राणघातक आक्रमण केले. यात भावेश परमार गंभीररित्या घायाळ झाले, तसेच त्यांचे पत्रकार मित्र घायाळ झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. परमार मित्राचा वाद मिटवण्यासाठी आले असता निजाम आणि इरफान यांनी त्यांच्यावर आक्रमण केले. पोलिसांनी गुन्हा नोंदवून निजाम मुघल आणि इरफान बलोच यांना अटक केली आहे. भावेश परमार हे भुजमधील मुंद्रा रोडवर रहात असून ‘बजरंग टी हाऊस’ नावाचे चहाचे दुकान चालवतात.
संपादकीय भूमिकागुजरातमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते ! |