Live In Relationship : ‘लिव्‍ह-इन रिलेशनशिप’ मध्‍ये रहाणार्‍यांना संरक्षण देणे, हे चुकीच्‍या गोष्‍टीला प्रोत्‍साहन देण्‍यासारखे !  – पंजाब आणि हरियाणा उच्‍च न्‍यायालय

हरियाणा – विवाहबाह्य संबंधातील जोडीदारासोबत ‘लिव्‍ह-इन रिलेशनशिप’मध्‍ये रहाणार्‍यांना संरक्षण देणे म्‍हणजे चुकीच्‍या गोष्‍टींना प्रोत्‍साहन देण्‍यासारखे आहे, असे निरीक्षण पंजाब आणि हरियाणा उच्‍च न्‍यायालयाने नोंदवले आहे. ४० वर्षीय महिला आणि ४४ वर्षीय पुरुष यांनी त्‍यांच्‍या कुटुंबियांकडून मिळणार्‍या धमक्‍यांमुळे उच्‍च न्‍यायालयाकडे संरक्षणाची मागणी केली होती. त्‍यावर न्‍यायालयाने हे निरीक्षण नोंदवले आहे.

१. ‘लिव्‍ह-इन रिलेशनशिप’मध्‍ये रहाणारा पुरुष आणि महिला दोघेही विवाहित असून दोघांनाही मुले आहेत. यातील महिलेने तिच्‍या पतीपासून घटस्‍फोट घेतला आहे; मात्र पुरुषाने पत्नीपासून घटस्‍फोट घेतलेला नाही.

२. न्‍यायालयाने म्‍हटले की, याचिकाकर्त्‍यांना पूर्ण माहिती होती की, त्‍यांचा विवाह झाला आहे आणि ते ‘लिव्‍ह-इन रिलेशनशिप’मध्‍ये येऊ शकत नाहीत.

३. न्‍यायालयाने म्‍हटले की, याचिकाकर्त्‍यांनी त्‍यांच्‍या घरातून पळून जाऊन केवळ कुटुंबांची अपकीर्ती करत नसूून, प्रतिष्‍ठेने आणि सन्‍मानपूर्वक जगण्‍याच्‍या अधिकाराचेही उल्लंघन केले. आहे.

४. विवाह हे एक पवित्र नाते आहे. समाजातही अशा विवाहांना महत्त्वपूर्ण स्‍थान दिले जाते. आपल्‍या देशात नैतिकता आणि संस्‍कृती यांना पुष्‍कळ महत्त्व आहे. सध्‍याच्‍या काळात आपण पाश्‍चात्त्य संस्‍कृती स्‍वीकारू लागलो आहोत. ही संस्‍कृती भारतीय संस्‍कृतीपासून अतिशय वेगळी आहे, असेही न्‍यायालयाने म्‍हटले आहे.