पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांच्याविषयी कु. प्रार्थना पाठक हिला आलेल्या अनुभूती

 ‘१.७.२०२४ ते १२.७.२०२४ या कालावधीत मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्याला होते. तेव्हा मी सनातन संस्थेच्या ४८ व्या संत पू. निर्मला दातेआजी यांचे दर्शन घेतले. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी

१. पू. दातेआजी यांचा देह हवेत तरंगत असल्याचे जाणवणे

१.७.२०२४ या दिवशी पू. दातेआजी यांना हाक मारल्यावर त्यांनी डोळे उघडले. तेव्हा ‘त्यांचा देह हवेत तरंगत आहे आणि त्यांच्या देहातून पांढरा प्रकाश प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले.

२. ५.७.२०२४ या दिवशी पू. आजींच्या डाव्या डोळ्याच्या भुवईच्या वर कपाळावर पांढर्‍या प्रकाशाचा उभा पट्टा मला दिसला.

आजारी अवस्थेतील पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी

३. पू. दातेआजी कु. प्रार्थनाकडे प्रीतीमय दृष्टीने पहात असल्याचे जाणवणे

पूर्वी मी आश्रमात सेवेला जातांना पू. आजी ‘माझा पोषाख कसा आहे ? मी कशी दिसत आहे ?’, हे पुष्कळ कौतुकाने पहायच्या. त्याप्रमाणे ‘आताही त्या माझ्याकडे प्रीतीमय दृष्टीने पहात आहेत’, असे मला जाणवले.

कु. प्रार्थना महेश पाठक

४. पू. दातेआजी यांच्या कपाळावर त्रिशुळासारखी आकृती दिसणे 

१०.७.२०२४ या दिवशी पू. आजींच्या कपाळावर त्रिशुळासारखी दैवी आकृती स्पष्ट दिसत होती. त्या आकृतीतून प्रकाशाचे किरण माझ्या दिशेने येत होते.

५. पू. दातेआजी यांच्या खोलीत गेल्यावर कु. प्रार्थनाला जाणवलेली सूत्रे

अ. वातावरणात उष्णता होती, तरीही पू. आजींच्या खोलीत गेल्यावर मला पुष्कळ थंडावा जाणवला.

आ. पू. आजींच्या खोलीतील वातावरण आणि बाहेरील वातावरण यांत पुष्कळ भेद जाणवला. पू. आजींच्या खोलीत प्रवेश करतांना ‘मी एका पोकळीत जात आहे’, असे मला जाणवले.

इ. ‘पू. आजींचा चेहरा काचेप्रमाणे पारदर्शक झाला आहे’, असे मला वाटले.

ई.  पू. आजींची सेवा करणार्‍या कुटुंबियांचे चेहरे थकलेले न दिसता तेजस्वी दिसत होते.

‘प.पू. गुरुदेव, तुमच्या कृपेमुळे मला पू. आजींचा प्रीतीमय सहवास पुष्कळ लाभला. त्यांचे चैतन्य ग्रहण करता आले. अशा प्रीतीस्वरूप पू. आजी मला दिल्याबद्दल तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– गुरुदेवांच्या चरणांवरील आनंदी फूल,

कु. प्रार्थना महेश पाठक (वय १३ वर्षे, आध्यात्मिक स्तर ६८ टक्के), पुणे (११.७.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक