Jharkhand Police Beat Students :पाकूर (झारखंड) येथे बांगलादेशी घुसखोर मुसलमानांच्या दहशतीच्या विरोधात आंदोलन करणार्या हिंदु विद्यार्थ्यांना पोलिसांकडून मारहाण
पाकूर (झारखंड) – पाकूर जिल्ह्यात बांगलादेशी घुसखोरांची दहशत आहे. त्यांच्यामुळे हिंदूंना घरे सोडून पळून जाण्यास भाग पाडले जात आहे. हिंदु मुलींची छेडछाड वगैरे प्रकार सर्रास झाले आहेत. लँड जिहादचे वास्तवही आता लोकांसमोर आले आहे. या अवैध घुसखोरांच्या विरोधात विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. या विद्यार्थ्यांना वसतीगृहात जाऊन पोलिसांनी बेदम मारहाण केली. याविषयी माजी मुख्यमंत्री आणि झारखंड भाजपचे अध्यक्ष बाबुलाल मरांडी यांनी सामाजिक माध्यमांतून छायाचित्रे प्रसारित केली आहेत. तसेच संबंधित पोलिसांवर गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करावी आणि घायाळ विद्यार्थ्यांच्या उपचाराची व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी पाकूर जिल्हाधिकार्यांना केली आहे.
बाबुलाल मरांडी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, मुख्यमंत्री हेमंत सोरेनजी, आपल्या माता-भगिनींच्या रक्षणासाठी घुसखोरीच्या विरोधात आवाज उठवणार्या तरुण विद्यार्थ्यांवर अत्याचार करण्याचे आणि बाहेरच्या लोकांवर एवढ्या प्रेमाचा वर्षाव करण्याचे कारण काय ? बांगलादेशी घुसखोर झारखंडची अस्मिता आणि अस्तित्व यांना धोका आहेत. त्यांना संरक्षण देऊन तुम्ही राज्यातील साडेतीन कोटी जनतेच्या सुरक्षेशी खेळत आहात.
पाकूरमधील हिंदुविरोधी घटना
१. काही दिवसांपूर्वी पाकूरमध्ये एका मुसलमान तरुणाने हिंदु तरुणीचा अश्लील व्हिडिओ प्रसारित करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर हिंदूंनी या घटनेचा निषेध करत तरुणाला बेदम मारहाण केली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या मुसलमानांनी हिंदूंच्या घरावर दगडफेक केली. यात घरांचीही हानी झाली.
२. येथे बांगलादेशी घुसखोरांच्या भीतीने हिंदू पळून जाण्याच्या सिद्धतेत असल्याचा दावा मरांडी यांनी केला होता. मरांडी म्हणाले होते की, झारखंडमधील परिस्थिती ९० च्या दशकातील काश्मीर आणि सध्याच्या बंगाल-केरळ राज्यांसारखी वाईट होत आहे. मुसलमानांच्या लांगूलचालनाच्या नावाखाली हिंदूंवर होणार्या आक्रमणांंकडे राज्य सरकारे डोळेझाक करत आहेत.
संपादकीय भूमिकाझारखंड मुक्ती मोर्चा सरकारच्या राज्यात बांगलादेशी घुसखोर मुसलमानांचे रक्षण करून राष्ट्रप्रेमी हिंदूंवर होणारा अत्याचार लज्जास्पद होय ! याविरोधात राष्ट्रप्रेमींनी सरकारला जाब विचारला पाहिजे. केंद्र सरकारनेही यात हस्तक्षेप करणे आवश्यक आहे ! |