राजकारण न करता दाऊद शेख याला फाशी देण्‍याची आंदोलन करणार्‍या हिंदु युवतींची मागणी !

  • उरण (जिल्‍हा रायगड) येथे दाऊद शेख याने यशश्री शिंदे हिची निर्घृण हत्‍या केल्‍याचे प्रकरण

  • माध्‍यमांसमोर धर्मांधांच्‍या कावेबाज प्रतिक्रिया !

  • आरोपी अद्याप फरार !

उरण येथे आंदोलन करताना हिंदूं

उरण – यशश्री शिंदे (वय २१ वर्षे) या तरुणीची दाऊद शेख याने अत्‍यंत विकृत आणि निर्घृणपणे हत्‍या केल्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर २८ जुलै या दिवशी येथील गांधी चौकात शेकडो हिंदूंनी आंदोलन केले. या आंदोलनाचे रूपांतर मोर्च्‍यामध्‍ये होऊन पोलीस ठाण्‍यावर मोर्चा नेण्‍यात आला. या आंदोलनात मोठ्या संख्‍येने युवती आणि युवक सहभागी झाले होते. युवतींनी ‘राजकारण न करता आरोपीला फाशी द्या’ अशी जोरदार मागणी या वेळी केली. ‘यशश्रीला न्‍याय मिळाला पाहिजे’ अशा घोषणा या वेळी देण्‍यात आल्‍या. या वेळी मुसलमान महिलांनी माध्‍यमांसमोर जाऊन ‘हे लव्‍ह जिहाद वगैरे काही नाही’ अशा प्रतिक्रिया देऊन ‘नॅरेटिव्‍ह’ (खोटे कथानक) पसरवण्‍याचा प्रयत्न केला’, असे आंदोलनात सहभागी झालेल्‍या प्रत्‍यक्षदर्शी हिंदुत्‍वनिष्‍ठांनी सांगितले. उरण येथील आंदोलनात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्‍या नेतृत्‍वाखाली काही हिंदूही सहभागी झाले होते.

धर्मांधांचा कावेबाजपणा

उरण येथे लव्‍ह जिहादच्‍या घटनेत तरुणीची अत्‍यंत क्रूरपणे हत्‍या केल्‍यानंतर हिंदूंचा रोष ओढवून घेण्‍यापासून वाचण्‍यासाठी येथे धर्मांधांनी मोठा कावेबाजपणा केला. एक तर ‘आरोपी पकडला गेला’ अशी अफवा पसरवण्‍यात आली. प्रत्‍यक्षात आरोपी दाऊद शेख हा उत्तरप्रदेशात पळून गेल्‍याचे समजते. दुसरे म्‍हणजे अनेक धर्मांध महिला या आंदोलनात सहभागी झाल्‍या. जेव्‍हा माध्‍यमांचे प्रतिनिधी तेथे आले, तेव्‍हा त्‍यांच्‍यासमोर जाऊन त्‍या म्‍हणाल्‍या, ‘‘याला धार्मिकतेचा रंग देऊ नका. हे लव्‍ह जिहाद वगैरे काही नाही. आमचाही याला विरोध आहे. आरोपीला शिक्षा द्या.’’ घाबरलेल्‍या धर्मांधांनी हिंदूंचा उद्रेक होऊ नये म्‍हणून सावधगिरी बाळगून आधीच अशा प्रकारे धर्मांध महिलांना पुढे पाठवून सारवासारव केली, असेच यावरून लक्षात आले.

दाऊद शेख याने याआधीही यशश्री हिला पूर्वी दिला होता त्रास !

नराधम दाऊद शेख बेंगरूळु आणि तेथून उत्तरप्रदेश येथे पळून गेल्‍याची माहिती आहे. काही वर्षांपूर्वी यशश्री हिच्‍या पालकांनी तक्रार दिल्‍यावर ‘पोक्‍सो’ (अल्‍पवयीन मुलींवर अत्‍याचार केल्‍याप्रकरणीचा कायदा) अंतर्गत कारागृहात शिक्षा भोगली होती. त्‍यानंतर परत त्‍याने येऊन तिची क्षमा मागण्‍याचे नाटक करून तिच्‍याशी मैत्री वाढवली. ते दोघे संपर्कात असल्‍याचे तिच्‍या भ्रमणभाषवरून पोलिसांच्‍या लक्षात आले.

पोलिसांचा नाकर्तेपणा !

१. यशश्री बेपत्ता झाल्‍याच्‍या दिवशी, म्‍हणजे २५ जुलै या दिवशी दुपारी ३ वाजता तिने एका मैत्रिणीला ‘मी संकटात आहे. मला कुणीतरी साहाय्‍य करा’, असे सांगितले होते. ‘त्‍याची माहिती पोलिसांना देऊनही त्‍यांनी याकडे दुर्लक्ष केले’, असा आरोप यशश्रीच्‍या पालकांनी केला आहे. (असे जनताद्रोही आणि संवेदनशून्‍य पोलीस हिंदूंचे कधी तरी रक्षण करतील का ? – संपादक)

२. उरण पोलीस ठाण्‍याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कोटे-पाटील यांनी सांगितले, ‘‘लव्‍ह जिहादचा या घटनेशी काहीही संबंध नाही.’’ (सर्व काही उघड दिसत असूनही पोलीस असे म्‍हणत असतील, तर असे पोलीस प्रशासन असतांना हिंदु मुली कधी तरी सुरक्षित रहातील का ? – संपादक)

यशश्री हिच्‍यावर पाशवी अत्‍याचार !

यशश्रीचा मृतदेह रक्‍ताच्‍या थारोळ्‍यात पडलेला होता. कुत्रे तिच्‍या शरिराचा चावा घेत होते. त्‍यामुळेे तिचा चेहरा आणखीनच विद्रूप झाला. तिच्‍या खांद्यावरील मांस कुत्र्यांनी खाल्ले. तिच्‍या पाठीवर आणि कमरेवर चाकूचे ३ वार होते. तिचे स्‍तन आणि हात कापलेले होते. चेहरा छिन्‍नविछिन्‍न होता.

  • नवी मुंबईत २९ गावांतील सहस्रो हिंदूंचा जनआक्रोश मोर्चा !

  • लव्‍ह जिहाद्यांना फाशी देण्‍याची मागणी !

नवी मुंबई – शिळफाटा येथील डोंगरावर विवाहितेवर झालेला सामूहिक बलात्‍कार आणि उरण येथील हिंदु मुलीची मुसलमानाने केलेली निर्घृण हत्‍या यांच्‍या विरोधात नवी मुंबईत जनआक्रोश मोर्चा काढण्‍यात आला. यात २९ गावांतील शेकडो नागरिक सहभागी झाले होते. त्‍या सर्वांनी संबंधित आरोपींना अटक करून फाशी देण्‍याची मागणी केली आहे. कोपरखैरणेसह वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोर्चा काढण्‍यात आला.