बोरिवली येथील इमारतीच्या आगीत एकाचा मृत्यू
मुंबई – बोरिवली पूर्व भागातील मागाठाणे मेट्रो स्थानकाजवळील ‘कनकिया समर्पण टॉवर’ या इमारतीला भीषण आग लागली. आगीत गुदमरून एकाचा मृत्यू झाला आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्नीशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी आल्या आणि आग आटोक्यात आणण्यात आली. ३ जण घायाळ झाले आहेत. आग विद्युत तारांपर्यंतच लागल्याने ६ व्या मजल्यापर्यंतच पोचू शकली. आगीचे नेमके कारण समोर आले नाही.