बेलापूर येथे इमारत दुर्घटनेमध्ये दोघांचा मृत्यू, २ जण गंभीर घायाळ !
नवी मुंबई, २७ जुलै (वार्ता.) – येथील बेलापूर गावामधील ४ मजली निवासी इमारत पहाटे पावणे पाच वाजता कोसळली. इमारतीच्या ढिगार्याखाली २ जण अडकले, याची माहिती नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिली आहे. या दुर्घटनेमध्ये दोघांचा मृत्यू झाला असून २ जण गंभीर घायाळ झाले आहेत.
रिक्शावाल्यामुळे वाचले अनेकांचे प्राण !
पहाटे ४ च्या सुमारास इमारतीखाली एक रिक्शावाला आला असता त्याला इमारतीच्या भिंतीमधून आवाज ऐकू आला. त्याने संभाव्य धोका लक्षात घेऊन तात्काळ इमारतीतील रहिवाशांना जागे केले आणि अवघ्या १५ मिनिटांत इमारत रिकामी करण्यात आली. त्यानंतर पुढील ५ मिनिटांत ही इमारत पत्त्यांसारखी कोसळली. त्यामुळे इमारतीतील रहिवासी भयभीत झाले.