मुंबई-गोवा, मुंबई-नाशिक महामार्गावरील सुरक्षित प्रवासासाठी समन्वयाने काम करा ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

गणेशोत्सवापूर्वी मुख्यमंत्री महामार्गांच्या कामाची पहाणी करणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई – मुंबई-गोवा महामार्ग आणि मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्ड्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळून नागरिकांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासनाने समन्वयाने काम करावे, तसेच दोन्ही महामार्गावरील बायपास, सर्व्हिस रोड यांचे मजबूतीकरण करून गणेशोत्सवापूर्वी दोन्ही महामार्ग खड्डेमुक्त करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मुंबई-गोवा महामार्ग आणि मुंबई-नाशिक महामार्गाच्या सद्य:स्थितीविषयी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. १० ऑगस्टनंतर दोन्ही महामार्गाच्या कामांची पहाणी ते करणार आहेत.