गुरुचरणी शरणागत रहाण्याचे महत्त्व !
१. मोठ्या वाईट शक्तीने ‘साधक तिचेच ऐकेल’, असे म्हटल्यावर साधकाला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले स्मित करतांना दिसणे आणि त्यानंतर साधकाला झोप लागून त्याच्या मनातील विचार पालटणे
‘३.४.२०२४ या दिवशी मी करत असलेल्या प्रत्येक कृतीत अडथळे येत होते. शेवटी हतबल होऊन मी खोलीत जाऊन झोपलो. त्या वेळी माझ्या मनात वैषेयिक विचार येऊ लागले. अचानक मला त्रास देणारी मोठी वाईट शक्ती सूक्ष्मातून म्हणाली, ‘बघा ! मी याला माझ्या कह्यातून कधीच सुटू देणार नाही. हा त्याच्या गुरूंचे ऐकणार नाही. केवळ माझेच ऐकेल.’ वाईट शक्तीच्या या बोलण्यामुळे मी आणखी अस्वस्थ झालो. तेवढ्यात मला सूक्ष्मातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले स्मित करतांना दिसले. त्यानंतर लगेचच मला झोप लागली. थोड्या वेळाने मला जाग आली. तेव्हा माझ्या मनातील वैषेयिक विचार नष्ट झाले होते. मला आश्चर्य वाटले. तेव्हा मला असे दिसले की, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले मला त्रास देणार्या मोठ्या वाईट शक्तीला म्हणत आहेत, ‘बघ त्याने कुणाचे ऐकले ?’
२. साधकाने प्रत्येक क्षणी गुरूंच्या चरणी शरणागत अवस्थेत रहाणे आवश्यक असल्याची जाणीव होणे
या अनुभूतीमुळे मला जाणीव झाली, ‘गुरूंचे त्यांच्या साधकाची प्रत्येक कृती, प्रत्येक विचार यांवर अधिपत्य असते. गुरु आपल्या साधकाला अर्धवट वाटेत कदापि सोडत नाहीत. काही कारणांमुळे साधक भरकटला, तरी योग्य वेळ येताच गुरु त्याला परत त्यांच्याकडे खेचून घेतात. त्यामुळे साधकाने प्रत्येक क्षणी गुरूंच्या चरणी शरणागत अवस्थेत राहिले पाहिजे. ‘माझ्या उद्धारासाठी प्रत्येक प्रसंग घडतो आहे’, या विचाराने त्यांचे स्मरण करत राहिले पाहिजे.’
– श्री. धैवत विलास वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.४.२०२४)
|