परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांच्या एका वाक्यातून ‘साधकांविषयी कृतज्ञता वाटायला हवी’, हे शिकवणे
विविध प्रसंगांतून ‘कृतज्ञता कशी असायला हवी ?’, हे परात्पर गुरु डॉक्टरांकडून शिकायला मिळणे !
‘हे प्रभो, एकदा मी रामनाथी आश्रमात काही सेवांच्या निमित्ताने आल्यावर मला आपले दर्शन झाले. त्या वेळी तुम्ही मला काय म्हणालात, ते आठवते ना ! ‘मी तुम्हाला भेटू शकलो नसल्याने फार अस्वस्थ झालो होतो. आज तुमच्या दर्शनामुळे माझ्यावर कृपा झाली’, हे तुमचे शब्द होते. भगवंता, तुम्ही मला निःशब्द केले होते.
अधूनमधून मी तुमच्या त्या शब्दांचे स्मरण करत होते. ‘यातून तुम्हाला मला काय शिकवायचे आहे ?’, हे जाणून घेण्यासाठी मी काही मास अभ्यास आणि चिंतन केले. जेव्हा साक्षात् परमेश्वराला माझ्यासारख्या सर्वसाधारण साधकाला भेटल्यावर कृपा झाल्याचे वाटत असेल, तर मला साधक भेटल्यावर, त्यांच्याशी संवाद साधतांना, दूरभाषवर त्यांचा आवाज ऐकतांना, त्यांचा सत्संग मिळाल्यावर किंवा त्यांचा विचार केल्यावर कसे वाटले पाहिजे ? साधक तर तुमचे सगुण रूप आहेत; मात्र माझ्यासारख्या अज्ञानी जिवाला हे लक्षात येत नाही. या प्रसंगामुळे तुम्ही माझा दृष्टीकोन पूर्णपणे पालटला आहे. हे प्रभो, तुम्ही मला अध्यात्मातील एक महत्त्वाचा धडा प्रायोगिक आणि आनंददायी पद्धतीने शिकवला. आम्हाला अध्यात्म शिकवण्यासाठी एवढ्या प्रायोगिक आणि आनंददायी पद्धती तुम्हाला कशा काय सुचतात ?’
– पू. (सौ.) उमा रविचंद्रन्, चेन्नई (२९.११.२०१६)