कर्नाटकातील तुमकुरु पालिकेची श्री सिद्धिविनायक मंदिर पाडून मोठे व्यापारी संकुल बांधण्याची योजना !
जनतेचा तीव्र विरोध
तुमकुरु (कर्नाटक) – येथील श्री सिद्धिविनायक मंदिर पाडून त्या जागेत मोठे व्यापारी संकुल (मॉल) बांधण्याची योजना तुमकुरु नगरपालिकेने आखली आहे. भाजप सरकारच्या काळात रहित करण्यात आलेल्या या योजनेला काँग्रेस सत्तेत आल्यानंतर चालना मिळाली आहे.
१. नगरपालिकेच्या या निर्णयाला आमदार, राजकीय नेते आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे आणि योजना रहित करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात आमदार ज्योती गणेश यांच्या नेतृत्वाखाली हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले आहे.
२. २ वर्षांपूर्वी या योजनेची कार्यवाही करण्यासाठी तुमकुरु नगरपालिका आणि ‘अॅग्रिकल्चरल प्रोड्युस मार्केट कमिटी’ (ए.पी.एम्.सी.) पुढे आल्या होत्या. योजनेची कार्यवाही करण्यासाठी श्री सिद्धिविनायक मंदिर पाडण्याच्या प्रयत्नात असतांना जनतेने तीव्र विरोध व्यक्त केला होता. जनतेच्या विरोधामुळे ही योजना रहित करण्यात आली होती.
संपादकीय भूमिकाया जागी मशीद असती, तर तुमकुरु पालिकेने असा निर्णय घेतला असता का ? काँग्रेसच्या राज्यात याहून वेगळे काय होणार ? |