Pune Rain Prediction : जुलै महिन्यात पूर आणि अतीवृष्टी यांमुळे मोठी हानी झाली !

पुण्यातील ज्योतिषी सिद्धेश मारटकर यांचे भाकित खरे ठरले !

ज्योतिष अभ्यासक सिद्धेश्‍वर मारटकर

पुणे – येथील ज्योतिषी सिद्धेश मारटकर यांनी जुलै-ऑगस्ट २०२४ या कालावधीत होणार असलेल्या घडामोडींच्या संदर्भात ‘ज्योतिष ज्ञान’ या त्रैमासिकात भाकितांच्या दृष्टीने भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे, ‘‘पूर, अतीवृष्टी, भूकंप अशा घटनांमुळे मोठी हानी होऊ शकते. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांना पुराचा फटका बसू शकतो. पाण्यात बुडून होणार्‍या मृत्यूची संख्या अधिक असेल. मंदिरे आणि शाळा यांनाही पुराचा पाण्याचा धोका संभावतो.’’ प्रत्यक्षातही मुसळधार पावसामुळे असे घडले.

‘राजकीय, नैसर्गिक आणि सामाजिक क्षेत्रांत मोठ्या घटना घडण्याची शक्यता आहे. यासह आरक्षणाचा वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. राजकीय व्यक्तींसाठी प्रतिकूल काळ आहे. मोठे राजकीय पक्ष फुटतील. मोठ्या व्यक्तींचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. सामाजिक आणि जातीय वाद वाढण्याची शक्यता आहे. वेळेपूर्वी विधानसभा निवडणुकांची घोषणा होऊ शकते. विचित्र साथीचे आजार बळावतील. या काळात आधुनिक वैद्य आणि शिक्षक यांचे संप, बंद, तसेच निदर्शने होतील. बँकांच्या व्याजदरात मोठी वाढ होईल’, अशीही भाकिते त्यांनी या मासिकात वर्तवली आहेत.

संपादकीय भूमिका 

ज्योतिष शास्त्राला थोतांड म्हणणार्‍या तथाकथित बुद्धीप्रामाण्यवाद्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?