महाराष्ट्रात गणेशोत्सवानिमित्त मिळणार ‘आनंदाचा शिधा’ !
|
मुंबई – यंदा गणेशोत्सवानिमित्त राज्यातील १ कोटी ७० लाख ८२ सहस्र ८६ शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ वितरित करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. प्रती संच १०० रुपये या सवलतीच्या दराने मिळाणार्या या शिध्यामध्ये प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि १ लिटर सोयाबीन तेल यांचा समावेश आहे. या संचाचे वाटप १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत करण्यात येईल.
राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या अंतर्गत अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक, तसेच छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागातील सर्व जिल्हे, नागपूर विभागातील वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्य्ररेषेवरील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकर्यांना हा शिधा मिळणार आहे. प्रती शिधापत्रिका एक शिधा जिन्नस संचाची खरेदी करण्यासाठी ५६३.५१ कोटी रुपये खर्चासाठी मान्यता देण्यात आली आहे. या संचाचे वाटप ई-पॉस प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे.