मंगळुरू (कर्नाटक) येथील कारागृहात बंदीवानांकडे सापडले २५ भ्रमणभाष संच !
मंगळुरू (कर्नाटक) – येथील कारागृहात १५० पोलिसांसह वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी घातलेल्या धाडीत बंदीवानांकडे २५ भ्रमणभाष संच, १ ब्लूटूथ उपकरण, ५ ईआरफोन, १ पेन ड्राईव्ह, ५ चार्जर, १ कात्री, तसेच गांजा सापडला. या वस्तू कारागृहात बंदीवानांपर्यंत कशा पोचल्या ?, याची चौकशी केली जात आहे.
संपादकीय भूमिकाकारागृहात बंदीवानांकडे भ्रमणभाष, अमली पदार्थ, शस्त्रे आदी गोष्टी पोचतात, हे आता नवीन राहिलेले नाही; मात्र यावर कायमस्वरूपी उपाययोजना कुणी काढल्याचे दिसत नाही, तसेच याला उत्तरदायी असणार्यांना कठोर शिक्षा झाली, असेही कधी समोर आले नाही. त्यामुळे अशा गोष्टी परत परत घडत रहातात ! |