Guna Convent : गुना (मध्यप्रदेश) येथील कॉन्व्हेंट शाळेच्या संमेलनात विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक म्हणण्यास विरोध !
|
गुना (मध्यप्रदेश) – गुना जिल्ह्यात असलेल्या ‘वंदना कॉन्व्हेंट स्कूल’मध्ये विद्यार्थी संमेलनाचा कार्यक्रम चालू असतांना विद्यार्थ्यांनी संस्कृत श्लोकाचे पठण केल्याने मुख्याध्यापिका मुख्याध्यापिका सिस्टर कॅथरीन या संतप्त झाल्या आणि त्यांनी विद्यार्थ्यांकडून माईक हिसकावून घेतला. याविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अ.भा.वि.प.च्या) कार्यकर्त्यांनी शाळेबाहेर निदर्शने केली. अभाविपचे कार्यकर्ते सक्षम दुबे आणि ध्रुवसिंग किरार यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. याप्रकरणी जिल्हा शिक्षणाधिकारी चंद्रशेखर सिसोदिया यांनी शाळेच्या मुख्याध्यापिकांना नोटीस बजावली आहे.
१. विद्यार्थी धुर्ब पालिया आणि गौरव किरार यांनी हिंदु संस्कृतीनुसार संस्कृत श्लोकाद्वारे भाषणाला प्रारंभ केला. त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर कॅथरीन यांनी संतप्त होऊन विद्यार्थ्यांसमोरचा माईक हिसकावून घेतला आणि त्यांना भाषण करण्यापासून रोखले. सिस्टर कॅथरीन यांनी मुलांना सांगितले की, हे येथे चालणार नाही, इंग्रजीत बोला.
२. शाळेच्या व्यवस्थापनाने सांगितले की, निवडलेले विद्यार्थी सहसा सकाळच्या संमेलनात हिंदी आणि इंग्रजी या भाषांचा वापर करतात. त्या दिवशीचे भाषण इंग्रजीत होणार होते; पण विद्यार्थ्यांनी भाषणाचा प्रारंभी संस्कृत श्लोकाद्वारे केला.
३. आंदोलकांनी शाळेच्या व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. ज्या संस्कृत श्लोकाचे पठण करण्यास प्रतिबंध करण्यात आला होता, तो श्लोक दैनंदिन शालेय प्रार्थनेत समाविष्ट करावा आणि मुख्याध्यापिका सिस्टर कॅथरीन यांना बडतर्फ करावे, अशा मागण्याही त्यांनी केल्या. अनुमाने २ घंटे हे आंदोलन चालले. जिल्हा शिक्षणाधिकारी घटनास्थळी पोचले आणि त्यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचेचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन थांबवण्यात आले.
संपादकीय भूमिका
|