संपादकीय : आतंकवादाच्या छायेत ऑलिंपिक !

पॅरिसमधील एका रस्त्यावर पोलीस अधिकारी पहारा देत आहेत

पॅरिस (फ्रान्स) येथे २६ जुलैपासून ऑलिंपिक स्पर्धांना आरंभ झाला आहे. ही स्पर्धा ११ ऑगस्टपर्यंत चालू रहाणार आहे. स्पर्धेच्या आधीच एका आतंकवाद्याचा व्हिडिओ प्रसारित झाला असून त्यात त्याने स्वतः ‘हमासचा सैनिक’ असल्याचे सांगून ‘पॅरिसच्या ऑलिंपिकमध्ये रक्ताच्या नद्या वहातील’, अशी अरबी भाषेत धमकी दिली आहे. हमासचा नेता इज्जत अल्-रिशेक याने हा व्हिडिओ बनावट असल्याचे म्हटले आहे; मात्र तरीही फ्रान्सकडून ऑलिंपिक स्पर्धेच्या ठिकाणची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. फ्रान्स सरकारने ऑलिंपिकच्या प्रत्येक दिवशी ३५ सहस्र, तर उद्घाटन समारंभासाठी ४५ सहस्र पोलीस तैनात केले आहेत. आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या हिंसक धमकीचा व्हिडिओ येणे हे चिंताजनकच आहे. जरी तो खोटा असल्याचे सांगितले जात असले, तरी त्या दृष्टीने दक्षता घेणे हे राष्ट्रसुरक्षेच्या दृष्टीने आवश्यकच आहे; कारण याआधीही भूतकाळात ऑलिंपिक हे आतंकवादी आक्रमणांचे लक्ष्य झाले होते. वर्ष १९७२ आणि १९९६ मध्ये अटलांटा येथे ऑलिंपिक स्पर्धेच्या वेळी पॅलेस्टिनी आतंकवाद्यांनी आक्रमणे केली आहेत. या आक्रमणांत इस्रायलचे अनेक खेळाडू ठार झाले होते. ही पार्श्वभूमी बघता या स्पर्धेला संरक्षण देणे अत्यावश्यक आहे.

इस्लामी वर्चस्व अधोरेखित करणार्‍या घटना !

वरील घटनेच्या पार्श्वभूमीवर याआधी घडलेल्या काही घटनांचाही विचार करणे क्रमप्राप्त ठरते. ४ दिवसांपूर्वी पॅरिसमध्ये ऑस्ट्रेलियातील एका महिलेवर अत्याचार झाला. ५ जणांनी तिच्यावर आक्रमण करून अत्याचार केला. महिलेने एका दुकानात आश्रय घेऊन स्वत:चा जीव वाचवला. आरोपींनी संबंधित महिलेचा भ्रमणभाषही चोरला. यानंतर पॅरिसच्या महापौरांनी खेळाडूंना ‘रात्री एकटे बाहेर पडू नका, तसेच आपापल्या संघाचा गणवेश त्या वेळी परिधान करू नका’, असे आवाहन केले आहे. आणखी एक घटना म्हणजे ऑलिंपिक स्पर्धा चालू होण्याच्या २ दिवस आधी तेथील पटांगणात (स्टेडियममध्ये) काही खेळाडू सामने खेळत होते. अर्जेंटिना आणि मोरोक्को यांच्यात फुटबॉलचा सामना रंगला होता. त्यात आधी मोरोक्को देश आघाडीवर होता; पण अर्जेंटिनाने बरोबरी साधल्यावर तेथे बसलेल्या चाहत्यांचे नियंत्रण सुटले आणि त्यांनी खेळाडूंवर पाण्याच्या बाटल्या फेकल्या. शेवटी सामना थांबवावा लागला. पटांगण रिकामे करण्यात आले. त्यानंतरचा सामना प्रेक्षकांविनाच करावा लागला. अनेक प्रेक्षक पुन्हा पटांगणात येत होते; पण पोलिसांनी त्यांना हाकलून दिले. या काळात अर्जेंटिनाच्या खेळाडूंनाही सुरक्षा पुरवावी लागली. हे असे का झाले ? तर मोरोक्को हा आफ्रिका खंडातील इस्लामी देश असून त्याच्या विरोधात अन्य देशांनी जिंकणे, हे इस्लामप्रेमींना रुचले नाही. ज्या चाहत्यांनी पाण्याच्या बाटल्या फेकल्या, ते मोरोक्कोचे समर्थक असणार, हे निश्चित ! स्पर्धेच्या २ दिवस आधी घडलेला हा प्रकार आणि आतंकवाद्याचा व्हिडिओ यांचा एकमेकांशी संबंध नसेल कशावरून ? आतापर्यंत घडलेल्या घटना आणि हमासचा व्हिडिओ म्हणजे स्पर्धेला लागलेले गालबोटच होय ! कोणतीही स्पर्धा सुरक्षित वातावरणात पार पडावी, असे प्रत्येक राष्ट्राला वाटते. त्या दृष्टीने फ्रान्सने पॅरिस ऑलिंपिकसाठी ६० सहस्र कोटींहून अधिक रुपये खर्च केल्याचे समजते; पण वरील स्वरूपाच्या घडलेल्या प्रतिकूल घटना पहाता तेथील स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत असल्याचे दिसून येते. वर्ष २०२२ मध्ये कतार देशात चालू असलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेमध्ये मोरोक्कोने पोर्तुगालचा पराजय केला होता. त्यानंतर फ्रान्समध्ये मोठ्या प्रमाणात दंगली करून विजयाचा उन्माद साजरा करण्यात आला. मोरोक्कोच्या समर्थक मुसलमानांनी पोलिसांवर आक्रमण केले आणि दगडफेकही केली. पोलिसांवर लाठीमारही करण्यात आला. दंगलखोर मुसलमानांनी गाड्या आणि दुकाने यांची तोडफोड केली. त्यांचा हा हिंसाचार पोलिसांनाही रोखता आला नाही. धर्मांध मुसलमानांची ही कुकृत्ये पहाता आता यंदाच्या ऑलिंपिक स्पर्धेत मोरोक्कोचा संघ पुन्हा विजयी झाला, तर काय घडेल, याचा विचारच न केलेला बरा ! ३१ ऑक्टोबर २०२३ या दिवशी पॅरिसच्या एका मेट्रो स्थानकावर हिजाब (मुसलमान महिलांकडून डोके आणि मान झाकण्यासाठी वापरण्यात येणारे वस्त्र) परिधान केलेली एक महिला ‘तुम्ही सर्व मरणार’, असे ओरडत होती. ती ‘अल्लाहू अकबर’ (अल्ला महान आहे.) म्हणत होती. पोलिसांनी तिच्यावर स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला. त्याच वर्षी फ्रान्सच्या एका शहरात माजी विद्यार्थ्याने केलेल्या आक्रमणात त्याच्या शिक्षकाचा मृत्यू झाला होता. या वेळी तो विद्यार्थीही ‘अल्लाहू अकबर’ म्हणत होता. जानेवारी २०१५ मध्ये २ इस्लामी आक्रमणकर्त्यांनी ‘शार्ली हेब्दो’ या प्रसिद्ध नियतकालिकाच्या पॅरिसमधील मुख्यालयावर आक्रमण करून १२ जणांना ठार केले होते. तेथील तत्कालीन पंतप्रधान फ्रँकोईस ओलांदे यांनी हे आतंकवादी आक्रमण असल्याचे घोषित केले होते. वर्ष २०२० मध्ये या नियकालिकाने पुन्हा तेच चित्र प्रसिद्ध करण्याचे सुतोवाच केल्यावरही जगभरातील इस्लामी राष्ट्रांत रणकंदन माजले होते.

विश्व आतंकवादमुक्त कधी होणार ?

आतंकवाद

फ्रान्सशी संबंधित असणार्‍या वरील घटना सर्वत्र इस्लामीवादाचे वर्चस्व वाढत असल्याचेच दर्शवतात. इस्लामीवाद म्हणजेच आतंकवाद ! हा आतंकवाद म्हणजे जागतिक स्तरावरील डोकेदुखी झालेली आहे. सर्वत्र मुसलमानांची वाढलेली लोकसंख्या, त्यांच्याकडून अल्पसंख्यांकांवर होणारे अत्याचार, पराजय झाल्यावर करण्यात येणारा उन्माद अशा घटनांचे चक्र अखंड चालूच आहे. प्रतिदिन आतंकवाद नव्या रूपात जन्म घेत आहे. अफगाणिस्तान हे राष्ट्र तर पुरते आतंकवादाची शिकारच झाले आहे. त्या राष्ट्राचे उरलेसुरले अस्तित्वही आतंकवाद्यांच्याच नियंत्रणात आहे. काही देशांमध्ये आतंकवादाच्या विरोधात मोर्चे काढले जात आहेत, आंदोलने केली जात आहेत. छोटासा इस्रायलही आतंकवादाच्या विरोधात नेटाने लढा देत आहे. ‘शार्ली हेब्दो’सह वर उल्लेखलेल्या घटना पहाता फ्रान्स वारंवार आतंकवादाचे लक्ष्य ठरत आहे. असे असूनही फ्रान्सने २० सहस्र शरणार्थी धर्मांध मुसलमानांना हाकलण्याचा राष्ट्रहितार्थ निर्णय घेतला आहे. ऑलिंपिकसाठी सहस्रोंच्या संख्येत सुरक्षा पुरवली आहे. भारतात एखादा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आयोजित केला आणि वरीलप्रमाणे धमकी आली, तर तिला तोंड देण्यासाठी आपण सक्षम आहोत का ? याचा भारताने विचार करायला हवा; कारण सैन्यदल कितीही सक्षम असले, तरी देशात कार्यरत असलेल्या ‘स्लीपर सेल’वर (गुप्तपणे कार्य करणार्‍या आतंकवादी गटावर) तितकेसे नियंत्रण नाही. त्यामुळे भारतातही आतंकवाद सर्वच स्तरांवर भारी पडत आहे. या आतंकवादाच्या विरोधात कृतीशील पावले उचलायला हवीत, तरच हे विश्व आतंकवादमुक्त होईल !

आतंकवादाच्या वाढत्या वर्चस्वाच्या विरोधात सर्वच राष्ट्रांनी कृतीशील पावले उचलल्यास विश्व आतंकवादमुक्त होईल !