Gantantra Mandap’ and ‘Ashoka Mandap’ : राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलचे ‘गणतंत्र मंडप’ आणि अशोका हॉलचे ‘अशोक मंडप’ असे नामकरण !
नवी देहली – राष्ट्रपती भवनातील ‘दरबार हॉल’चे नामकरण ‘गणतंत्र मंडप’, तर ‘अशोका हॉल’चे ‘अशोक मंडप’ असे नामकरण करण्यात आले आहे.
१. राष्ट्रपती भवन व्हॉईसरॉय याच्यासाठी बांधले गेले होते आणि ब्रिटीश राजवटीत व्हाईसरॉयचा दरबार या ‘दरबार हॉल’मध्ये भरवला जायचा.
२. राष्ट्रपती भवनातील ‘दरबार हॉल’ (गणतंत्र मंडप) हा भारतातील अनेक ऐतिहासिक पालटांचा साक्षीदार आहे. याच दरबार हॉलमध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर, १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र भारताच्या पहिल्या सरकारने शपथ घेतली होती.
३. दरबार हॉल हे राष्ट्रपती भवनाचे सर्वांत भव्य सभागृह मानले जाते. या हॉलमध्ये बसवलेले झुंबर वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे झुंबर बेल्जियन काचेचे बनवलेले असून ते ३३ मीटर लांब आहेत. या हॉलमध्ये उत्कृष्ट दर्जाचा संगमरवर बसवला आहे.