भाग्यनगरहून येऊन विशाळगडावरील मुसलमानांना पैसे वाटणार्यांची चौकशी करा !
हुपरी येथे निवेदनाद्वारे मागणी
हुपरी (कोल्हापूर) – विशाळगडावर ‘हैदराबाद युथ करेज’ नावाच्या गटाने नोटांची बंडले वाटल्याचा ‘व्हिडिओ’ प्रसारित झाला आहे. हा पैसा या गटाला कुठून उपलब्ध झाला आणि हे पैसे वाटून त्यांना काय साध्य करायचे आहे ? हे समोर आणण्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, या मागणीचे मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हुपरी नगर परिषद येथे प्रशांत तराळ आणि हुपरी पोलीस ठाण्यात साहाय्यक पोलीस निरीक्षक एन्.आर्. चौखंडे यांना देण्यात आले. विशाळगडावर १४ जुलैला जो उद्रेक झाला, त्याला पूर्णतः प्रशासन उत्तरदायी आहे. ही घटना प्रशासनाच्या बोटचेप्या आणि अन्यायकारक भूमिकेमुळेच घडली आहे. त्यामुळे या प्रकरणी कारवाई केलेल्या सर्व हिंदूंवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, अशी मागणीही या प्रसंगी करण्यात आली.
या प्रसंगी सर्वश्री नितीन काकडे, मारुति कुंभार, मोहन कांबळे, सचिन माळी, रमेश सुतार, सतीश माने, ऋषिकेश दिवाण, सुजितसिंह कुंभार, प्रशांत साळोखे, ओमराज माळवदे, नितीन खेमलापुरे, राकेश वडर, संतोष पतंगे, ऋषिकेश साळी, महेश उलपे, अभिषेक जाधव यांसह अन्य उपस्थित होते.